पणजी (गोवा) -शिवसेनेचे बंडखोर अर्थात एकनाथ शिंदे गट काल रात्री गोव्यात दाखल झाला. या सर्व बंडखोर आमदारांची राहायची व्यवस्था पणजीतील ताज कन्वेंशन सेंटरमध्ये करण्यात आली होती. हाती आलेल्या माहितीनुसार, थोड्याच वेळात बंडखोर आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे.
हेही वाचा -प्रियकराबरोबर पत्नी गेली पळून, पतीने 2 मुलींची केली हत्या
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर बंडखोर आमदारांची ही पहिलीच बैठक आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे स्वतः मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. सुमारे साडेअकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास शिंदे मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे भाजपला पाठिंबा दर्शवणारे बंडखोर आमदारांचे पत्र घेऊन दुपारच्या सुमारास मुंबईत दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. थोड्याच वेळात या सर्व बंडखोर आमदारांची एक महत्वाची बैठक कन्व्हेंशन सेंटरमध्ये पार पडणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आपला राजीनामा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सुपुर्द केला आहे. त्यानंतर राज्यात असलेले महाविकास आघाडीचे सरकार संपुष्टात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर बंडखोर शिंदे गटाची महत्त्वाची बैठक थोड्याच वेळात पार पडणार आहे. या बैठकीत पुढील रणनीती ठरविण्यात येणार आहे.
हेही वाचा -Rudraprayag Accident : अहमदनगरमधील भाविकांच्या गाडीचा रुद्रप्रयागमध्ये अपघात.. महिलेचा मृत्यू.. १० जण जखमी