- मुख्यमंत्री आज कोल्हापूर दौऱ्यावर; पूरग्रस्त भागाची करणार पाहणी
कोल्हापूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (30 जुलै) कोल्हापूरचा दौरा करणार आहेत. कोल्हापुरातील पूरग्रस्त भागांमध्ये जाऊन मुख्यमंत्री पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री सकाळी 9 वाजता विमानाने मुंबईहून कोल्हापूरला जाणार आहेत. सकाळी 10 वाजता ते कोल्हापुरात पोहचतील. त्यानंतर साडेअकरा वाजता शिरोळ येथील नरसिंह वाडी येथे पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी एक वाजता कोल्हापूर शहरातील पूरस्थितीची पाहणी करणार आहेत. दुपारी 2 वाजता कोल्हापूर शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक घेणार आहेत.
- ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांचा आज कोल्हापूर दौरा
कोल्हापूर - महावितरण वीज यंत्रणेचे अतोनात नुकसान झाले आहे. कोल्हापूर व सांगली येथील नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे आज, 30 जुलै रोजी या परिसराचा दौरा करणार आहेत. डॉ. राऊत हे सकाळी 9.00 वाजता कराडहून सांगलीकडे प्रयाण करतील. इथला दौरा झाल्यानंतर ते दुपारी 2.30 वाजता सांगलीहून कोल्हापूरकडे प्रयाण करतील. कोल्हापूर जिल्ह्यातील बापट कॅम्प, नागाळा पार्क, दुधाळी उपकेंद्र येथील विद्युत विभागाच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर पुरग्रस्तांची विचारपूस करून गरजवंतांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करणार आहेत. त्यानंतर शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे सायंकाळी 5.30 वाजता माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत.
- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाही आज कोल्हापूर दौरा
कोल्हापूर - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज सकाळी 9 वाजता आंबेवाडी आणि चिखली गावातील पूरस्थितीची पाहणी करणार आहेत. तेथून परत कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी 2 वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत.
- मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची जंगल सफारी आजपासून सुरू