- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱयाचा आज दुसरा दिवस
पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आले आहेत. पुण्यातील मनसे शाखाप्रमुखांसोबत ते चर्चा करत आहेत. राज ठाकरे यांच्या पुणे दौऱयाचा आज दुसरा दिवस आहे. राज हे आज बाबासाहेब पुरंदरे यांनादेखील भेटणार आहेत.
- अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर
नाशिक - मनसेचे नेते व राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. पक्ष बांधणीसाठी अमित ठाकरे आता ग्राऊंडवर उतरले असल्याची चर्चा आहे. येत्या पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देखील अमित ठाकरे हे आज नाशिकमधील मनसे पदाथिकाऱ्यांसोबत बैठक करणार आहेत.
- मुख्यमंत्री ठाकरेंचा आजचा कोल्हापूर पूरस्थिती पाहणी दौरा रद्द
कोल्हापूर -अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या कोल्हापूरमधील पूरस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आढावा घेण्यासाठी आज दौऱ्यावर जाणार होते. मात्र, कोल्हापूरला रेड अलर्ट जारी करण्यात आल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे.
- देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर आज कोल्हापूर पूरस्थितीची करणार पाहणी