- 1) दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा आज 64 वा दिवस
कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकऱयांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा आज 64 वा दिवस आहे. तीन कृषी कायदे केंद्र सरकारने मागे घेण्याची प्रमुख मागणी या शेतकऱयांची आहे. याला विरोध दर्शवण्यासाठी 26 जानेवारीला शेतकऱयांनी दिल्लीत ट्रॅक्टर परेडचे आयोजन केले होते. याला हिंसक वळण लागले होते.
- 2) आजपासून गडचिरोली येथून 'राष्ट्रवादी परिवार संवाद' दौऱयाला सुरुवात
आजपासून (28 जानेवारी) 'राष्ट्रवादी परिवार संवाद' दौऱ्याला विदर्भातील नक्षलग्रस्त जिल्ह्यातून सुरुवात होणार आहे. हा संवाद दौरा गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथून सुरू होणार आहे. 3 हजार किलोमीटरचा दौरा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी दिली.
- 3) मराठा क्रांती ठोक मोर्चाची आज औरंगाबादेत पत्रकार परिषद
मराठा क्रांती ठोक मोर्चाची आज पत्रकार परिषद होणार आहे. दुपारी अकरा वाजता औरंगाबादमधील क्रांतिचौक येथे ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे.
- 4) शिवसेनेचे नेते धवलसिंह मोहिते पाटील यांचा आज काँग्रेसमध्ये प्रवेश
शिवसेनेचे नेते धवलसिंह मोहिते पाटील यांनी सेनेला रामराम ठोकत काँग्रेसचा हात हातात घेतला आहे. धवलसिंह मोहिते पाटील हे आज दुपारी 3 वाजता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
- 5) विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या 'वार्षिक कामाचा लेखाजोखा' या पुस्तकाचे आज प्रकाशन
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या 'वार्षिक कामाचा लेखाजोखा' या पुस्तकाचे आज प्रकाशन होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
- 6) मुंबई पालिकेच्या हेरिटेज वॉकचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते होणार उद्घाटन