तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी एम. के. स्टॅलिन यांचा शपथविधी -
१० वर्षांच्या सत्तेच्या वनवासानंतर आज तामिळनाडूत द्रविड़ मुनेत्र कळघम (डीएमके) ची सरकार बनत आहे. डीएमके अध्यक्ष एम. के. स्टॅलिन पहिल्यांदाच मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. राजभवन परिसरात सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एक विशेष कार्यक्रमात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित एम. के. स्टॅलिन यांना मुख्यमंत्री पदाची शपथ देतील. स्टॅलिन यांच्यानंतर मंत्रिमंडळातील अन्य मंत्र्यांचाही शपथविधी होईल.
स्वित्झर्लंडकडून ऑक्सिजन, व्हेंटिलेटर भारतात दाखल -
600 ऑक्सिजन कंसंट्रेटर, 50 व्हेंटिलेटर आणि अन्य वैद्यकीय उपकरणे घेऊन स्वित्झर्लंडहून विमान आज पहाटे भारतात दाखल झाले. ही सामुग्री भारतातील अनेक शहतील आज वितरीत केली जाईल.
भारताला स्वित्झर्लंडकडून मदत पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची कोरोना आढावा बैठक -
पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर असून कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर ते पत्रकार परिषद घेणार आहेत. पुणे शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या आढावा बैठकीत काय निर्णय घेतला जातो याविषयी सर्वांना उत्सुकता आहे.
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची पत्रकार परिषद -
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज पत्रकार परिषद घेणार आहेत. प्रवीण दरेकर मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया देतील.
भाजप प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांची पत्रकार परिषद -
माजी खासदार संजय काकडे यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संजय काकडे आज पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेत आहेत.
दिल्ली सरकारकडून आज नवीन गाईडलाईन -
दिल्लीत वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून नवीन गाईडलाईन जारी केली असून त्यानुसार आता आंध्रप्रदेश व तेलंगाणा राज्यातून दिल्लीत येणाऱ्यांना १४ दिवस विलगीकरणात राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.
रविंद्रनाथ टागोर यांची आज जंयती -
नोबेल पारितोषिक विजेते साहित्यिक रविंद्रनाथ टागोर यांची आज जयंती. ज्यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते. टागोर हे एक ब्राह्मोपंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार होते. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगीतात एक आमूलाग्र बदल घडून आला. रवींद्रनाथ हे भारताचे व आशियातील पहिले नोबेलविजेते होते.
रविंद्रनाथ टागोर यांची जंयती हिमाचल व मध्यप्रदेशमध्ये आजपासून १७ मे पर्यंत संचारबंदी -
वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हिमाचलप्रदेश व मध्यप्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून १७ मे पर्यंत दोन्ही राज्यांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांना या संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे.
हिमाचल व मध्यप्रदेशमध्ये संचारबंदी कर्नाटक सरकारची आज बैठक, लॉकडाऊनवर होणार निर्णय आहे.
कर्नाटकमध्ये कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी आज कॅबिनेट बैठक बोलावली असून. राज्यात लॉकडाऊन लागू करण्याबाबत चर्चा होऊ शकते.
मध्यप्रदेशमध्ये मुख्यमंत्री किसान-कल्याण योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार निधी -
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान शुक्रवारी 'मुख्यमंत्री किसान-कल्याण योजना' अंतर्गत राज्यातील 75 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1500 कोटी रूपये जमा करतील. हा कार्यक्रम व्हर्चुअल असणार आहे. या कार्यक्रमात मंत्री, आमदार, सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी व मुख्यमंत्री किसान-कल्याण योजनेचे लाभार्थी उपस्थित असणार आहेत. .