मंगळागौर Mangalagaur 2022 हे हिंदू धर्मातील Hinduism एक व्रत आहे. ते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी Every Tuesday in the month of Shravan नवविवाहित महिलेने Newly married women लग्नानंतर पहिली पाच वर्षे करावयाचे असते. श्री शिव आणि पार्वती हे आदर्श गृहस्थाश्रमाचे उदाहरण मानले जाते. पतीपत्नीमधील आत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून या दांपत्याकडे पाहिले जाते. त्यांची कृपादृष्टी प्रत्येक नवविवाहीत दांपत्यावर राहावी किंवा त्यांच्या आदर्शाचे स्मरण करण्याच्या हेतूने ही पूजा Importance Rituals Puja करतात.जाणुन घेऊया पूजासाहित्य, विधी आणि उद्यापनविधी बाबत Puja Sahitya and Udaypan Rituals सविस्तर माहीती.
नवविवाहित मुली श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीचे पूजन करतात. पूजेदरम्यान गौरी गौरी सौभाग्य दे अशी प्रार्थना करतात. सामूहिकरीत्या ही पूजा करण्यात विशेष आनंद मिळतो. कारण या निमित्ताने मैत्रिणी,बहिणी,शेजारी व इतर सगळे नातेवाईक एकत्र जमतात आणि खेळ खेळतात. खेळ खेळणे म्हणजे मंगळागौरीवर आधारीत गाणी गाऊन तालपुर्वक नाचणे होय.
नवविवाहित स्त्रिया या दिवशी आंघोळ करुन, नऊवारी नेसून पूजेला बसतात. त्यात मंगळागौर म्हणजे अन्नपूर्णा या पार्वतीच्या रूपाची धातूची मूर्ती मांडण्यात येते. शेजारी महादेवाची पिंडीही सजवतात. मंगळागौरीची यथाविधी पूजा करतात. या पूजाप्रसंगी शक्तीतत्वाची आराधना करतात. माता, विद्या, बुध्दी, शक्तीरूपात राहणा-या देवीची उपासना करुन व तिचे दैवी गुण स्वत:मध्ये यावेत अशी प्रार्थना यावेळी वैवाहीक स्त्रिया करतात.
मंगळागौरी करीता आवश्यक पूजासाहित्यया पूजेकरिता अन्नपूर्णा देवीची मूर्ती, रोजचे पूजेचे साहित्य, बुक्का, अक्षता, पाच खारका, पाच सुपा-या, पाच बदाम, पाच खोब-याच्या वाटया, सोळा प्रकारची पाने, दोन वस्त्र, आठ वाती, कापूर, गुलाल, बेल, फुले, दुर्वा, सोळा काडवाती, तुळशीची पाने, केळी किंवा पेरूचा नैवेद्य, पंचामृत, दुधाचा नैवेद्य, जानवे, सोळा विडयाची पाने, गणपतीसाठी सुपारी, अत्तर, शक्य असल्यास केवडयाचे कणीस, एक नारळ, कापड, हळद-कुंकू इत्यादी साहित्याची गरज असते.
पत्रीपूजा म्हणजे पानांची पूजावेगवेगळ्या झाडांची पाने व फुले या पूजेत वापरली जातात. पूजा करतांना १६ प्रकारच्या झाडांची पाने वाहीली जातात. ज्यामध्ये अर्जुनसादडा, आघाडा, कण्हेर, चमेली, जाई, डाळिंब, डोरली, तुळस, दुर्वा, धोत्रा, बेल, बोर, माका, मोगरा, रुई, विष्णुक्रांता, शमी, शेवंती अशा झाडांची पाने पत्रीपूजेला वापरतात. ही झाडे औषधीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची म्हणून आयुर्वेदात मानली गेली आहेत. पूर्वी भारतात आयुर्वेदाचा प्रसार होत होता .या पूजेच्या निमित्ताने सर्व प्रकारच्या औषधी झाडांची नव्या विवाहितेस ओळख व्हावी व पुढील आयुष्यात गरज पडल्यास ते झाड पटकन ओळखता यावे, अशी पत्रीपूजेमागची भावना असू शकते.
पूजा झाल्यावर सर्वजणी एकत्र बसून मंगळागौरीची कहाणी वाचतात. मग आरती करून प्रसाद वाटला जातो. त्यानंतर पूजेसाठी आलेल्या सवाष्णींचे भोजन होते. मंगळागौर पूजलेल्या मुलींनी शक्यतो मौन धारण करुण जेवायचे असते. जेवणानंतर तुळशीचे पान खाल्ली जातात.