हैदराबाद - 'गुरू बिन ज्ञान न उपजै, गुरू बिन मिलै न मोष। गुरू बिन लखै न सत्य को गुरू बिन मिटै न दोष'।। गुरुच्या परिस स्पर्षाशिवाय मनुष्यातील अज्ञान रुपी अंधकार दूर होत नाही आणि ज्ञानाचा दीप प्रज्वलितही होत नाही. गुरुच्या सहवासाशिवाय सत्य-असत्याची जाणीवही होत नाही आणि काय योग्य, काय अयोग्य याचेही ज्ञान गुरुच्या संगतीशिवाय मिळत नसल्याचे संत कबीर सांगतात. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे महत्त्व हे अनन्यसाधारण असते. जीवन जगताना कोणाला आई-वडिलांच्या कष्टातून-शिकवणीतून गुरु भेटले तर कोणाला शिक्षकांच्या एका प्रोत्साहनपर शब्दाने आयुष्याची दिशा मिळाली. महाराष्ट्राची माती आणि माणसे यांनाच काही एकलव्यांनी गुरु मानले तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर भेटणारी आणि नवे काहीतरी शिकवणारी प्रत्येक व्यक्ती मग ते आई-वडील, शिक्षक, पत्नी, मुले, मित्र कोणीही असेल, पण त्यांच्याकडून चांगले तेवढे घेण्याची वृत्ती जागृत ठेवून असली पाहिजे.
गुरुपौर्णिमेचे महत्त्व -आषाढातील शुक्ल पक्ष पोर्णिमेला गुरूपौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी गुरूंची पुजा केली जाते. संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो. प्राचीन काळात विद्यार्थी आश्रमात शिक्षण घेत असताना भावपूर्ण श्रद्धेने गुरूपूजा करून गुरूदक्षिणा देत असतात. चारही वेदांवर पहिल्यांदा भाष्य करणाऱ्या व्यास ऋषिंची आजच्या दिवशी पूजा केली जाते. व्यासांनीच लोकांना वेदाचे ज्ञान दिले. ते आपले आद्यगुरू आहेत. त्यामुळे गुरू पौर्णिमेला व्यास पोर्णिमा असेही म्हटले जाते. म्हणूनच या दिवशी आपण आपल्या गुरूला व्यासांचा अंश मानून त्यांची पूजा करतो.
शिर्डीत गुरुपौर्णिमेनिमित्त उत्सव - शिर्डीत गुरूपोर्णिमा उत्सवास ( Gurupornima celebration in Shirdi ) भक्तीमय वातावरणात सुरूवात झाली आहे. सकाळच्या काकड आरतीनंतर साई मंदिरापासुन ते साईंची प्रतीमा, वीणा आणि साईसच्चरीत्र ग्रंथांची मिरवणूक साईंच्या व्दारकामाई पर्यंत नेण्यात आली. व्दारकामाईत अखंड पारायणाच वाचन करुन, गुरुपोर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली आहे. उत्सवानिमीत्त साई मंदिराला ( Sai Temple ) आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शिर्डीत गुरुपोर्णिमा उत्सव 3 दिवस साजरा केला जातो. सविस्तर वाचा - Guru pournima celebrations : साईबाबांच्या शिर्डीत 115 व्या गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात
साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या (Shirdi Temple) वतीने मंगळवार दिनांक १२ जुलै ते गुरुवार दिनांक १४ जुलै २०२२ या काळात गुरुपौर्णिमा उत्सव (How will be Celebrated Gurupournima festival in Sai temple) साजरा केल्या जाणार आहे. या उत्सवात सर्व साईभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी केले आहे. सविस्तर वाचा - Gurupournima Festival :अश्या पद्धतीने साजरा होणार साई मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव.....
महाराष्ट्रात विविध ठिकाणी गुरु पौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, ते पुढील प्रमाणे -