तामिळनाडू :चेन्नईच्या नुंगमबक्कम येथील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये ( Army Public School Chennai ) लष्करी परीक्षेतील गैर व्यवहारांसाठी तोतयागिरी आणि ब्लूटूथ उपकरणे वापरल्यामुळे हरियाणातील 29 उमेदवारावर गुन्हा ( Army Exam Case ) दाखल करण्यात आला आहे.
Army Exam Case : लष्करी परीक्षेत तोतयागिरी; हरियाणातील 29 उमेदवारांवर गुन्हा दाखल - Army Public School Chennai
चेन्नईच्या नुंगमबक्कम येथील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये ( Army Public School Chennai ) लष्करी परीक्षेतील गैर व्यवहारांसाठी तोतयागिरी आणि ब्लूटूथ उपकरणे वापरल्यामुळे हरियाणातील 29 उमेदवारावर गुन्हा दाखल ( Army Exam Case ) करण्यात आला आहे.
लष्करी छावणीच्या नोकऱ्यांसाठी डिफेन्स सिव्हिलियन रिक्रूटमेंट ग्रुप सी परीक्षा 9 ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या नुंगमबक्कम येथील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये घेण्यात आली होती. तामिळनाडू राज्यातील लोकांसह इतर राज्यातील 1,728 लोक या परीक्षेत बसले होते. दरम्यान, हरियाणातील 29 परीक्षार्थी गैरव्यवहारासाठी ब्लूटूथ उपकरणे वापरत होते. त्यामुळे हरियाणातील 29 उमेदवारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय जो त्या राज्यातील आहे. तो विनोद सुक्रासोबत गेला आणि परीक्षा परीक्षा लिहिण्यासाठी तोतयागिरी त्यांने केली. त्यानंतर लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीच्या आधारे चेन्नईतील नंदमबक्कम पोलिस ठाण्यात हरियाणातील २९ उमेदवारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी परीक्षकांची चौकशी करून नंतर त्यांची जामिनावर सुटका केली आहे.