महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Uttakhand Election 2022 : उत्तराखंडच्या तिहेरी लढतीत 'हे' नेते ठरतील 'किंगमेकर' - उत्तराखंड निवडणूक आयोग

देवभूमी, अशी ओळख असलेल्या उत्तराखंड राज्याच्या विधानसभेसाठी झालेल्या मतदानाचे निकाल गुरुवारी (दि. 10 मार्च) जाहीर होणार आहेत. विधानसभेच्या एकूण 70 जागांसाठी 14 फेब्रुवारीला मतदान झाले होते. त्यावेळी एकूण मतदारांपैकी 65.10 टक्के मतदारांनी आपले मतदानाचे हक्क बजावले. 70 जागांसाठी एकूण 632 उमेदवार रिंगणात असून त्यापैकी 62 महिला आपले नशिब आजमावत आहेत. मात्र, काही मतदारसंघात ही निवडणूक भाजप व काँग्रेस, अशी दुहेरी तर काही मतदारसंघात भाजप,काँग्रेस व आम आदमी पक्ष, अशी तिहेरी लढत लागली आहे. यामध्ये तीनही पक्षातील मुख्य उमेदवार किंगमेकरची भूमिका बजावतील.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Mar 9, 2022, 6:47 PM IST

हैदराबाद - देवभूमी, अशी ओळख असलेल्या उत्तराखंड राज्याच्या विधानसभेसाठी झालेल्या मतदानाचे निकाल गुरुवारी (दि. 10 मार्च) जाहीर होणार आहेत. विधानसभेच्या एकूण 70 जागांसाठी 14 फेब्रुवारीला मतदान झाले होते. त्यावेळी एकूण मतदारांपैकी 65.10 टक्के मतदारांनी आपले मतदानाचे हक्क बजावले. 70 जागांसाठी एकूण 632 उमेदवार रिंगणात असून त्यापैकी 62 महिला आपले नशिब आजमावत आहेत. मात्र, काही मतदारसंघात ही निवडणूक भाजप व काँग्रेस, अशी दुहेरी तर काही मतदारसंघात भाजप,काँग्रेस व आम आदमी पक्ष, अशी तिहेरी लढत लागली आहे. यामध्ये तीनही पक्षातील मुख्य उमेदवार किंगमेकरची भूमिका बजावतील.

पुष्कर सिंह धामी - भाजप

उत्तराखंडचे सर्वात तरुण मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे राज्याचे 11वे मुख्यमंत्री आहेत. भगत सिंह कोश्यारी यांचे निकटवर्तीय असलेल्या धामी हे तरुणपणापासूनचनच भाजपमध्ये सक्रिय आहेत. 2002 ते 2008 पर्यंत ते भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष होते.

तरुण वर्गाची चांगली पकड- युवा मोर्चाचे नेतृत्व करताना त्यांनी राज्यात सर्वत्र फिरून प्रचार केला होता. बेरोजगार तरुणांना सोबत घेत एक भव्य रॅली काढत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यानंतर त्यांच्या पाठीशी असलेल्या युवाशक्तीचा विचार करत पक्षाने त्यांना उमेदवारी दिली होती.

सैनिकी कुटुंबात झाला जन्म - पिथौरागड जिल्ह्यातील डीडीहाटच्या टुण्डी या गावातील एका सैनिकी कुटुंबात धामी यांचा जन्म झाल. त्यांनी शासकीय शाळेतच आपले शिक्षण पूर्ण केले. शैक्षणीक काळातच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ( ABVP ) च्या संपर्कात आले व 1990 ते 1999 पर्यंत परिषदचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम पाहिले.

भारतीय जनता युवा मोर्चाद्वारे सुरू ठेवले आपले कार्य- 2002 ते 2008 या काळात युवा मोर्चाची धुरा संभाळत असताना युवा रोजगाराच्या मुद्द्यावरून राज्यातील युवकांची मोठ बांधली. त्यावेळी उद्योगांमध्ये स्थानिक युवकांसाठी 70 टक्के आरक्षण मिळवून देण्याची घोषणा त्यांनी केली होती आणि मिळवून दिलेही, त्यामुळे युवा वर्गात त्यांची एक वेगळी छबी निर्माण झाले. 2012 च्या विधानसभा निवढणुकीत भाजपने त्यांना खटीमा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. या निवडणुकीत ते चांगल्या मताधिक्यांनी निवडून आले. 2017 साली भाजपने पुन्हा त्यांची उमेदवारी दिली त्यावेळीही ते निवडणूक आले. काही काळानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री झाले.

पुष्कर सिंह धामी यांची माहिती

हरीश रावत यांची राजकीय कारकीर्द ( काँग्रेस )(Harish Rawat’s Political Career) - हरीश रावत यांच्या राजकारणाची सुरुवात ग्रामपंचायतीपासून झाली. त्यानंतर व्यापारी संघटनेचे व युवक काँग्रेचे सदस्य म्हणून त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरू ठेवला. 1980 साली त्यांनी अल्मोडा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे बलाढ्य नेते मुरली मनोहर जोशी यांना धूळ चारली होती. त्यानंतर 1984 साली ते मुरली मनोहर जोशी यांचा मोठ्या फरकाने पुन्हा पराभव केला. 1989 साली लोकसभा निवडणुकीच्या वेळी स्वतंत्र उत्तराखंडसाठीच्या आंदोलनाने रौद्ररुप घेतले होते. दरम्यान, 1989 साली उत्तराखंड क्रांती दल (UKD)चे नेते काशी सिंह ऐरी यांचा पराभव करत सलग तिसऱ्यांना खासदारकी जिंकली होती. पण, ती कमी फरकाने जिंकली. त्यानंतर 1991, 1996, 1998 व 1999 असे सलग चारवेळा त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना हरिद्वार मतदारसंघातून तिकीट दिले. त्यावेळी त्यांनी विजय मिळवला. त्यानंतर 2009 ते 2012 पर्यंत ते यूपीए सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री होते. 2012 ते 2014 या काळात केंद्रीय कॅबिनेट मंत्री झाले. त्यानंतर फेब्रुवारी, 2014 साली त्यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली व 2017 पर्यंत मुख्यमंत्री पदावर राहीले. दरम्यान, जुलै, 2014 मध्ये उत्तराखंडच्या धारचुला येथून पोटनिवडणुकीत ते जिंकून आले. 2017 च्या उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्यावेळी हरीश रावत यांनी हरिद्वार ग्रामीण व किच्छा या दोन्ही ठिकाणाहून निवडणूक लढवली. पण, दोन्ही जागांवरून त्यांचा पराभव झाला. मुख्यमंत्री असतानाही दोन्ही मतदार संघातून पराभव झाल्याने काँग्रेस पक्षाला मोठा झटका लागला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते नैनीताल-उधमसिंह नगर मतदारसंघातून रिंगणात उतरले. मात्र, त्यांचा पुन्हा पराभव झाला.

हरीश रावत यांची राजकीय चढ-उतार - मुख्यमंत्री पदावर असताना हरीश रावत यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ अत्यंत उलथापालथ करणारा ठरला. धारचुला विधानसभा मतदारसंघातून निवडून येत ते मुख्यमंत्री झाले होते. मार्च, 2016 मध्ये काँग्रेसच्या 9 आमदारांनी बंडखोरी केली. त्यामुळे रावत यांची बहुमताची सरकार अल्पमतात आली व राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यानंतर मे, 2016 मध्ये विश्वासमत सिद्ध करत रावत पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. मुख्यमंत्री पदावर असताना हरीश रावत यांनी मे, 2017 साली हरिद्वार व किच्छा या दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढवली. पण, त्यांचा पराभव झाला.

चार दशकांचा अनुभव - हरीश रावत हे मागील चार दशकांपासून राजकारणात सक्रिय आहेत. 2000 साली ज्यावेळी उत्तराखंड स्वतंत्र राज्य झाले. त्यावेळी सर्वानुमते काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी त्यांची वर्णी लागली. 2002 साली काँग्रेसने उत्तराखंड कोट्यातून त्यांना राज्यसभा सदस्य केले व 2008 पर्यंत ते राज्यसभा सदस्य होते. यावेळी ते लालकुआ मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत.

हरीश रावत यांची माहिती

अजय कोठियाल - ( आम आदमी पक्ष )- आम आदमी पक्ष पहिल्यांदाच उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. निवृत्त कर्नल अजय कोठियाल यांना आम आदमी पक्षाने विधानसभा निवडणुकीत मुख्ममंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित केले आहे. कोठियाल हे गंगोत्री विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सेवानिवृत्त कर्नल अजय कोठियाल यांचा जन्म 26 फेब्रुवारी, 1968 झाला असून ते उच्चशिक्षित आहेत. त्यांनी दोनवेळा एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. सैन्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून युवकांना जोडण्याचे काम केले.

सैन्यात बजावली महत्त्वाची कामगिरी- अजय कोठियाल यांनी 'ऑपरेशन कोंगवतन'मध्ये सात दहशतवाद्यांना ठार केले होते. त्यांच्या या कामगिरीमुळे 'किर्ती चक्र' देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यानंतर 'ऑपरेशन पराक्रम'च्यावेळी त्यांच्या पथकाने 21 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यापैकी 17 दहशतवाद्यांना ठार करण्यात तत्कालीन मेजर अजय कोठियाल यांची महत्त्वाची भूमिका होती.

उत्तराखंडला बनवायची आहे जगाची अध्यात्मिक राजधानी- उत्तराखंडमध्ये 2013 साली हिमालयन त्सुनामीत केदारनाथ येथे प्रचंड हानी झाली होती. त्यावेळी केदारनाथचे पुनर्निर्माण करण्यात निवृत्त कर्नल अजय कोठियाल यांचा सक्रिय सहभाग होता. अजय कोठियाल यांच्या नावाची घोषणा करताना दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल म्हणाले होते, अजय कोठियाल यांच्या नावाची घोषणा आमच्या पक्षाने नाही तर उत्तराखंडच्या जनतेने केली आहे. ते म्हणाले होते, येथील राजकीय नेते उत्तराखंडला लूटत होते, तेव्हा कोठियाल देशाची रक्षा करत होते. ज्या प्रकारे देशाची राजधानी दिल्ली आहे, त्या प्रकारे उत्तराखंडला जगाची अध्यात्मिक राजधानी बनवायची आहे, असेही केजरीवाल म्हणाले होते.

अजय कोठियाल यांची माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details