महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Actor Siddharths Controversy : अभिनेता सिद्धार्थचे अकाउंट त्वरित बंद करा- राष्ट्रीय महिला आयोगाची ट्विटर इंडियाकडे मागणी - immediately block actor Siddharths twee

राष्ट्रीय महिला आयोगाच्या चेअरमनने ( National Commission for Women chairperson ) ट्विटर इंडियाला ( NCWC writes letter to Twitter India ) पत्र लिहून अभिनेता सिद्धार्थचे ट्विटर अकाउंट बंद करण्याची विनंती केली आहे. अभिनेता सिद्धार्थचे ट्विट हे महिलांविरोधी आणि अपमानकारक असल्याचे महिला आयोगाच्या चेअरमनने ( NCWC on Actor Siddharths tweet  ) म्हटले आहे. दुसरीकडे अभिनेता सिद्धार्थने अपमानाचा हेतू नसल्याचा खुलासा केला आहे.

Actor Siddharth
अभिनेता सिद्धार्थ

By

Published : Jan 10, 2022, 3:06 PM IST

नवी दिल्ली- मोदी सरकारच्या धोरणावर सतत टीका करणारा अभिनेता सिद्धार्थ वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सिद्धार्थने बॅडमिंटनपटू सायना नेहवालवर ( shuttler Saina Nehwal ) ट्विट केले होते. या ट्विटवरून राष्ट्रीय महिला आयोगाने कारवाईचा पवित्रा घेतला आहे.

पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी निर्माण झाली होती. त्यावर बॅडमिंटनपटू सायना नेहवालने चिंता व्यक्त करत पंतप्रधान मोदींवरील कथित हल्ल्याचा निषेध केला होता. पंतप्रधानांच्या सुरक्षेत तडजोड होत असेल तर देश सुरक्षित असल्याचा दावा करता येत नाही, असेही सायनाने ट्विटमध्ये म्हटले होते. त्यावरून अभिनेता सिद्धार्थने सायना व मोदी सरकारला टोला लगाविणारे ट्विट ( actor Siddharth tweet on Saina Nehwal )केले होते. मात्र, त्यामधील द्विअर्थी शब्दामुळे अभिनेता सिद्धार्थवर टीका होता आहे.

हेही वाचा-Family Commits Suicide Fear of Covid 19 : तामिळनाडूत कोरोनाच्या भीतीने कुटुंबाने केले विष प्राशन; दोघांचा मृत्यू

राष्ट्रीय महिला आयोगाच्या चेअरमनने ( National Commission for Women chairperson ) ट्विटर इंडियाला ( NCWC writes letter to Twitter India ) पत्र लिहून अभिनेता सिद्धार्थचे ट्विटर अकाउंट बंद करण्याची विनंती केली आहे. अभिनेता सिद्धार्थचे ट्विट हे महिलांविरोधी आणि अपमानकारक असल्याचे महिला आयोगाच्या चेअरमनने ( NCWC on Actor Siddharths tweet ) म्हटले आहे. दुसरीकडे अभिनेता सिद्धार्थने अपमानाचा हेतू नसल्याचा खुलासा केला आहे. तसे असते तर वाचनदेखील चुकीचे असते, असे अभिनेत्याने म्हटले आहे.

हेही वाचा-PM security breach : न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली होणार पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रृटीची चौकशीराष्ट्रीय महिला आयोगाने महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांनाही पत्र ( NCW written to DGP Maharashtra ) लिहिले आहे. या पत्रात त्यांनी तपास करून गुन्हा दाखल करण्याची सूचना केली आहे.

  • काय आहे प्रकरण?

पंजाबातील शेतकरी संघटनांशी संबंधित निदर्शकांनी पंतप्रधान मोदींच्या वाहनांचा ताफा अडवला होता. त्यानंतरही पंजाब पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली असा आरोप केला जात आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींचा ताफा फ्लायओव्हरवर 20 मिनिटे खोळंबला होता. या प्रकरणावर पंतप्रधान मोदी यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. तसेच केंद्रीय गृह मंत्रालयाने पंजाब सरकारकडे या गंभीर प्रकाराबद्दल खुलासा मागितला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details