नवी दिल्ली- भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटा ( India experience extreme heatwaves ) आणि वाढत्या तापमानाचा अनुभव येत आहे. अशातच भारताच्या हवामान विभागाने (IMD) नैऋत्य मान्सून अंदमान आणि निकोबार बेटांवर ( IMD on Southwest monsoon ) दाखल झाल्याचे जाहीर केले आहे. मान्सून हंगाम सुरू झाल्याचे संकेत ( onset of the monsoon season ) आयएमडीने दिले आहेत.
अंदमान आणि निकोबार बेटे आणि लगतच्या भागात कमी उष्णकटिबंधीय पातळीवर दक्षिण-पश्चिमी वारे मजबूत झाल्यामुळे पाऊस पडत आहे, असे IMD ने एका निवेदनात म्हटले ( IMD on Monsoon ) आहे. "येत्या दोन ते तीन दिवसांत दक्षिण बंगालच्या उपसागरातील ( Conditions favorable for outhwest monsoon ) काही भाग, संपूर्ण अंदमान आणि अंदमान बेटे आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात नैऋत्य मोसमी पावसाच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल आहे," असे हवामान कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले ( Delhi ) temperatures आहे. दिल्लीचे तापमान ४९ अंश सेल्सिअसच्या जवळपास गेल्याच्या एका दिवसानंतर दिल्लीत सोमवारी तापमानात २-३ अंश सेल्सिअसची घसरण झाली.
तापमान कमी होण्याचा अंदाज-भारतीय हवामान विभागाने म्हटले, की आज तापमान आधीच घसरले आहे. सकाळी 11.30 च्या निरीक्षणानुसार, तापमान आधीच 2-3 अंश सेल्सिअसने घसरले आहे. त्यामुळे, आमच्या निरीक्षणानुसार, आजचे तापमान कालच्या निरीक्षणापेक्षा 2-3 अंश सेल्सिअस कमी असेल. वरिष्ठ म्हणाले. आयएमडीचे शास्त्रज्ञ आर के जेनामानी म्हणाले, "काही स्थानकांवर ४६-४८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते, ते ४३-४४ अंशांपर्यंत खाली येईल. सफदरजंगसाठी ते ४२-४३ अंश सेल्सिअस राहील. उद्यापासून ३-४ दिवस दिलासा मिळेल. मग तापमान पुन्हा वाढेल,” ते पुढे म्हणाले.