महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'रामदेव बाबांविरुद्ध गुन्हा दाखल करा, अन्यथा अॅलोपॅथी बंद करा'; आयएमए आक्रमक - इंडियन मेडिकल असोसिएशन

अॅलोपॅथिक उपचार पद्धतीबाबत रामदेव बाबा यांनी अवमानजक भाषा वापरल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यावरून इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA)ने आक्रमक भूमिका घेतलीय असून रामदेव बाबा यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. यासंदर्भात आयएमएने थेट केंद्रीय आरोग्य मंत्रालयालकडे दाद मागितली आहे.

रामदेव बाबा
रामदेव बाबा

By

Published : May 23, 2021, 5:33 PM IST

नवी दिल्ली -सध्या योगगुरू रामदेव बाबा यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यामध्ये अॅलोपॅथिक उपचार पद्धतीबाबत रामदेव बाबा यांनी अवमानजक भाषा वापरल्याचे पाहायला मिळते. यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. यावरून इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA)ने आक्रमक भूमिका घेतलीय असून रामदेव बाबा यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. यासंदर्भात आयएमएने थेट केंद्रीय आरोग्य मंत्रालयालकडे दाद मागितली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री (हर्षवर्धन), जे स्वत: आधुनिक वैद्यकीय यंत्रणा अ‍ॅलोपॅथीचे डॉक्टर आहेत आणि आरोग्य मंत्रालयाचे प्रमुख आहेत. त्यांनी एकतर या गृहस्थांचे (रामदेव बाबा) आव्हान आणि आरोप स्वीकारावे आणि आधुनिक औषधाची विल्हेवाट लावावी. नाहीतर मग अशा अवैज्ञानिक माहितीपासून लोकांना वाचवण्यासाठी रामदेव बाबा यांच्यावर साथीच्या कायद्यांतर्गत तक्रार दाखल करावी, असे इंडियन मेडिकल असोसिएशन केंद्रीय आरोग्य मंत्रालायाला म्हटलं आहे. रामदेव यांना कायदेशीर नोटीस पाठविण्यात आणि त्यांच्याकडून लिखित माफी घ्यावी, अशी मागणीही आयएमएने केली आहे.

रामदेव बाबांनी माफी मागावी, नाहीतर...

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) आणि सफदरजंग हॉस्पिटलच्या डॉक्टर असोसिएशननेही रामदेव बाबा यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. चुकीची माहिती पसरविणारे असे व्हिडिओ नियंत्रणात ठेवले पाहिजेत. रामदेव यांच्याविरूद्ध साथीचा अधिनियम 1987 च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करावा. तसेच त्यांनी माफी मागावी. नाहीतर आंदोलन करू, असा इशारा असोसिएशनने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिला आहे.

काय म्हणाले रामदेव बाबा?

रामदेव बाबा यांनी अॅलोपॅथिक उपचार पद्धतीला मूर्खपणा असे म्हटलं. अॅलोपॅथीच्या अपयशाबद्दलही त्यांनी भाष्ये केले. उपचारपद्धती मूर्ख आणि वैज्ञानिक दिवाळखोरी आहे. हायड्रोक्लोरिक्विन फेल झालं. नंतर प्लाझ्मा थेरपी, रेमडेसिव्हीर इंजेक्शन, फॅबिफ्लू फेल ठरलं. लाखो लोकांचा मृत्यू अॅलोपॅथीचा उपचार घेतल्यामुळे झाला आहे. जेवढ्या रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन न मिळाल्यानं आणि रुग्णालयात न गेल्यामुळे झाला. त्यापेक्षा जास्त रुग्ण अॅलोपॅथीउपचार मिळाल्यानंतरही मृत्युमुखी पडले. त्यामुळे आता अनेक मुत्यूचे कारण अॅलोपॅथिक उपचार पद्धती आहे.

हेही वाचा -गोव्यात २० ठिकाणे हॉटस्पॉट म्हणून घोषित, कोरोनामुळे आणखीन ३० बळी

ABOUT THE AUTHOR

...view details