नवी दिल्ली - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत तर्कवितर्क लढविले जात असताना देशातील डॉक्टरांची सर्वात मोठी संघटना असलेल्या आयएमने महत्त्वाची भूमिका मांडली आहे. कोरोनाच्या लढाईत राज्यांनी दुर्लक्ष करू नये, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) राज्यांना केले आहे. तिसरी लाट अटळ आणि खूप जवळ असल्याचा इशारा आयएमएने दिला आहे.
भारत हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सक्रिय नेतृत्व आणि आधुनिक वैद्यकीय सेवांमुळे नुकतेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून बाहेर पडला आहे. जागतिक पुरावे आणि जगातील महामारींचा इतिहास पाहता कोरोनाची तिसरी लाट अटळ आहे. अत्यंत महत्त्वाच्या वेळी प्रत्येकाने तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. देशातील अनेक भागांमध्ये राज्य सरकार आणि जनता हे दोघेही आत्मसंतुष्ट आहेत. कोरोनाच्या काळात नियमांचे उल्लंघन करत गर्दी करत आहेत.
हेही वाचा-सोन्याच्या दरात प्रति तोळा १६९ रुपयांची घसरण; चांदीही स्वस्त
...तर तिसऱ्या लाटेचा परिणाम कमी होऊ शकतो!
वैश्विक लसीकरण हे जास्तीत लोकसंख्येपर्यंत पोहोचविल्याने आणि कोरोनाच्या काळात योग्य वर्तवणूक केल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम कमी होऊ शकतो, असे आयएमएने म्हटले आहे.