डुंगरपूर ( जयपूर )- जिल्ह्यातील बिछीवाडा पोलीस ठाण्याने आग्राहून गुजरातला जाणाऱ्या एका ट्रॅव्हल्स बसमधून 1 हजार किलोहून अधिक अवैधपणे जाणारी चांदी जप्त केली आहे. ही चांदी बसमध्ये लपविण्यात ( illegal silver recovered from bus in Dungarpur ) आली होती. पोलिसांनी बस ताब्यात घेतली आहे. मात्र, बस कोणाची आहे हे समजू शकलेले नाही.
डीएसपी राकेश कुमार शर्मा ( DSP Rakesh Kumar Sharma ) यांनी सांगितले की, श्रीनाथ ट्रॅव्हल्सची ( Srinath Travels Rajsthan ) बस रविवारी सकाळी 11.20 वाजता राष्ट्रीय महामार्ग 48 वर रतनपूर सीमेवर ( Ratanpur border illegal silver transport ) ताब्यात घेण्यात आली आहे. बस सुरू करताना झडती घेतली असता बसमध्ये काहीही आढळून आले नाही. मात्र, बसच्या खालच्या बाजूची झडती घेतली असता मागील टायरखाली बॉक्स दिसला. या बॉक्समध्ये तस्करीचा संशय आल्याने पोलिसांनी ती उघडली. बसमधील सीटच्या खाली आणि टायरच्यामध्ये तळघरसारख्या बनवलेल्या बॉक्समध्ये अनेक प्रकारची बॉक्स सापडले आहेत. यात लहान-मोठी अशी सुमारे 70 पाकिटे सापडली. त्यात सोने, चांदी आणि मोती असल्याचे चालक व चालक मदतनीसाने सांगितले.
जप्त केलेल्या वस्तू मोजण्याकरिता 10 तासांपेक्षा जास्त वेळ-पोलिसांनी ही पाकिटे उघडली तेव्हा त्यात सोन्या-चांदीचे दागिने, चांदीच्या मूर्ती आणि इतर वस्तूंसह सापडल्या आहेत. डीएसपी राकेश कुमार यांनी सांगितले की, जप्त केलेल्या वस्तूंचे वजन करण्यात आणि मोजण्यासाठी 10 तासांपेक्षा जास्त वेळ लागला. रात्री अकराच्या सुमारास सर्व वस्तू मोजण्यात आल्या आहेत. पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला. डीएसपी यांनी सांगितले की, 1321 किलो चांदी, 173 किलो, 923 ग्रॅम मोती, 202 किलो, 432 किलो रोख, 210 ग्रॅम सोने आणि 56 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.