महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 8, 2023, 9:39 AM IST

ETV Bharat / bharat

Landslide Due To Meat Eating : लोकांनी मांस खाल्ल्यामुळं हिमाचलमध्ये भूस्खलन, ढगफुटी; 'आयआयटी'च्या संचालकांचा अजब दावा

Landslide Due To Meat Eating : आयआयटी मंडीच्या संचालकांनी विद्यार्थ्यांना एक विचित्र सल्ला दिलाय. 'चांगला माणूस बनायचं असेल तर मांस खाणं बंद करा', असं ते म्हणाले. तसेच त्यांनी हिमाचलमधील नैसर्गिक आपत्तीचा संबंध मांस खाण्याशी जोडला आहे. वाचा पूर्ण बातमी.

IIT Mandi director laxmidhar behera v
आयआयटी मंडीचे संचालक लक्ष्मीधर बेहरा

पहा काय म्हणाले लक्ष्मीधर बेहरा

मंडी (हिमाचल प्रदेश) Landslide Due To Meat Eating : आयआयटी मंडीचे संचालक लक्ष्मीधर बेहरा यांचं एक अजब वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी हिमाचल प्रदेशात नुकत्याच आलेल्या नैसर्गिक आपत्तीचा संबंध माणसांच्या मांस खाण्याशी जोडला आहे. या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांना आता चोहूकडून टीकेचा सामना करावा लागतोय.

विद्यार्थ्यांना 'मांस खाणार नाही' अशी शपथ घ्यायला सांगतात : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, आयआयटी मंडीचे संचालक लक्ष्मीधर बेहरा विद्यार्थ्यांना संबोधित करताना मांस न खाण्याचा सल्ला देत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, एखाद्याला चांगला माणूस व्हायचं असेल तर त्यानं मांस खाऊ नये. या व्हिडिओमध्ये ते मुलांना मांस न खाण्याची शपथ देतानाही दिसत ​​आहेत. 'चांगला माणूस बनण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल?' असं ते विचारतात. नंतर ते, 'मांस खाऊ नये', असं म्हणतात. त्यानंतर ते विद्यार्थ्यांना 'मी मांस खाणार नाही' अशी शपथ घ्यायला सांगतात.

हेही वाचा :controversy in IIT Mumbai : आयआयटी मुंबईत शाकाहारवाले म्हणतात येथे मांसाहारांना जागा नाही

प्राण्यांच्या कत्तलीचा पर्यावरणाच्या ऱ्हासाशी संबंध : पुढे बोलताना लक्ष्मीधर बेहरा म्हणतात की, 'निरपराध प्राण्यांची हत्या झाल्यास हिमाचल प्रदेशाची मोठी पडझड होईल'. 'तुम्ही निष्पाप प्राण्यांची हत्या करत आहात. प्राण्यांच्या कत्तलीचा पर्यावरणाच्या ऱ्हासाशी संबंध आहे. आपण ते पाहू शकत नाही, मात्र त्याचा परिणाम होतोच. हिमाचल प्रदेशात वारंवार होणारं मोठ्या प्रमाणातील भूस्खलन, ढगफूटी आणि इतर नेसर्गिक आपत्ती या सर्व प्राण्यांवरील क्रुरतेचे परिणाम आहेत', असं ते म्हणाले.

'ईटीव्ही भारत' व्हिडिओची पुष्टी करत नाही : लक्ष्मीधर बेहरा यांनी हे वक्तव्य कोणत्या कार्यक्रमादरम्यान केलं याबद्दल कोणतीही माहिती नाही. यूट्यूबवर अपलोड केलेला हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर आता टीकेची झोड उठली आहे. लक्ष्मीधर बेहरा यांचे हे विचार स्वतःचे वैयक्तिक असू शकतात. ईटीव्ही भारत अशा कोणत्याही व्हायरल व्हिडिओची पुष्टी करत नाही.

हेही वाचा :

  1. Udhayanidhi Stalin : मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा प्रताप; 'सनातन धर्मा'ची तुलना 'डास' आणि 'मलेरिया'शी
  2. Car Operate On Fingers : फक्त बोटांच्या इशाऱ्यावर धावते कार; 'आयआयटी'च्या विद्यार्थ्याची कमाल

ABOUT THE AUTHOR

...view details