महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

IIT Hyderabads Raindrop Research : पावसाचा अचूक अंदाज घेणारी रेनड्रॉप संशोधन सुविधा स्थापित, आयआयटी हैदराबादचा उपक्रम - जागतिक हवामान बदल

आयआयटी हैदराबादच्या संशोधकांनी पावसाचा अचूक अंदाज वर्तवण्यासाठी आणि ढगांपासून ते जमिनीवरील वातावरणातील परिस्थितीचे अनुकरण करण्यासाठी रेनड्रॉप संशोधन सुविधा स्थापन केली आहे. शुक्रवारी, नीती आयोगाचे सदस्य व्ही.के. सारस्वत यांच्या हस्ते या रेनड्रॉप रिसर्च फॅसिलिटीचे उद्घाटन करण्यात आले.

IIT Hyderabads Raindrop Research
रेनड्रॉप संशोधन सुविधा

By

Published : Feb 4, 2023, 3:54 PM IST

हैदराबाद :इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हैदराबाद (IITH) ने पावसाचा अचूक अंदाज वर्तवण्यासाठी आणि ढगांपासून ते जमिनीवरील वातावरणातील परिस्थितीचे अनुकरण करण्यासाठी रेनड्रॉप रिसर्च फॅसिलिटी (RRF) स्थापन केली आहे. या रेनड्रॉप रिसर्च फॅसिलिटीचे उद्घाटन शुक्रवारी, नीती आयोगाचे सदस्य व्ही.के. सारस्वत यांच्या हस्ते करण्यात आले. पर्जन्यमानाचा अचूक अंदाज पर्यावरणीय संशोधनातील प्रमुख आव्हानांपैकी एक आहे, कारण पावसावर अनेक घटक आणि वातावरणीय परिस्थितींचा प्रभाव पडतो. RRF पावसाची अधिक अचूक समज देईल, ज्यामुळे जागतिक हवामान बदल अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल.

आरआरएफ प्रणालीचे महत्व : रेनड्रॉप रिसर्च फॅसिलिटी प्रणालीचे वेगळेपण स्पष्ट करताना, आरआरएफ मधील प्रमुख संशोधक आणि आयआयटीएच मधील रासायनिक अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक कीर्ती साहू म्हणाले की, 'वास्तविक वातावरणीय परिस्थितीत सूक्ष्म भौतिक प्रक्रियेच्या मूलभूत ज्ञानाचा अभाव असणे, हे पावसाच्या मॉडेलिंगमधील महत्त्वाच्या अडचणींपैकी एक आहे.' तेव्हा रेनड्रॉप रिसर्च फॅसिलिटी प्रणाली यासाठी अचुक मदत करेल.

विद्यमान मोजमाप पद्धतींपेक्षा खूप वेगळी प्रणाली :'आयआयटीएचमध्ये विकसित केलेल्या नवीन प्रायोगिक सुविधेचा वापर करून, तापमान -10-अंश सेल्सिअस ते 40-अंश सेल्सिअस पर्यंत बदलले जाऊ शकते आणि सापेक्ष आर्द्रता शून्य ते संपृक्तता पातळीपर्यंत राखली जाऊ शकते. अशा प्रकारे, आम्ही ढगातून गतिशील वातावरणातील परिस्थितीची नक्कल करू शकतो. विविध उंचीवर पावसाच्या थेंबांचे आकार आणि आकारमान वितरण परिस्थिती तयार करण्यासाठी आणि अंदाज लावण्यासाठी आणि पावसाचा अंदाज सुधारण्यासाठी या माहितीचा उपयोग केला जाईल. त्यामुळे ही पद्धत सध्या वापरात असलेल्या इतर मोजमाप पद्धतींपेक्षा खूप वेगळी आणि विकसित आहे, असेही प्राध्यापक कीर्ती साहू यावेळी म्हणाले.

संपूर्ण जगाला उपयुक्त ठरणारं यंत्र : आयआयटी हैदराबादमध्ये विकसित केलेले मशीन लर्निंग-आधारित डिजिटल होलोग्राफी तंत्र उच्च अवकाशीय रिझोल्यूशनसह पावसाच्या थेंबांविषयी त्रिमितीय माहिती कॅप्चर करण्यासाठी एक शक्तिशाली साधन म्हणून उदयास आले आहे. हे तंत्र अद्वितीय प्रायोगिक सुविधेसह एकत्रित केल्यावर पावसाचा अंदाज सुधारण्यासाठी फायदेशीर ठरेल. आयआयटीएचचे संचालक, बी.एस. मूर्ती म्हणाले की, 'या सुविधेमुळे हवामानाच्या अंदाजाबाबत, विशेषत: पर्जन्यमानावर बरीच माहिती मिळण्याची अपेक्षा आहे. हे केवळ आपल्या देशासाठीच नाही, तर संपूर्ण जगाला पावसाचा अंदाज बांधण्यासाठी उपयुक्त ठरणारं यंत्र आहे.

हेही वाचा : Student Invents Robot Like Alexa : अकरावीच्या विद्यार्थ्याने बनवला अलेक्सासारखा रोबोट, पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details