नवी दिल्ली : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (IGNOU) प्रादेशिक भाषांमध्ये शिक्षण देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विद्यापीठाने युट्युब चॅनलद्वारे 13 प्रादेशिक भाषांमध्ये ऑनलाइन लेक्चर्स सुरू केली आहेत. इग्नूचे कुलगुरू प्रा. नागेश्वर राव यांनी ही माहिती दिली.
या भारतीय भाषांमध्ये अभ्यासक्रम सुरु झाला लेक्चर्स यूट्यूब चॅनलवर उपलब्ध : इग्नूच्या युट्यूब चॅनलवर दररोज एका भाषेची चार लाईव्ह लेक्चर्स होत आहेत. ती नंतर यूट्यूब चॅनेलवर अपलोड केली जातात. याद्वारे जे विद्यार्थी लाइव्ह लेक्चर घेऊ शकत नाहीत ते त्यांच्या सोयीनुसार आणि वेळेनुसार लेक्चर पाहू शकतात. ही लेक्चर्स सकाळी 9 ते 11 आणि दुपारी 2 ते 4 या वेळेत आयोजित केली जातात. आतापर्यंत 13 प्रादेशिक भाषांमध्ये साडेचार हजारांहून अधिक लेक्चर्स झाली आहेत. ती सर्व यूट्यूबवर अपलोड करण्यात आली आहेत. यामुळे प्रादेशिक भाषांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल हळूहळू वाढतो आहे.
विद्यार्थ्यांचा भाषेचा अडथळा दूर झाला : यावर इग्नूचे कुलगुरू म्हणाले की, दक्षिण भारतातील बहुतांश विद्यार्थ्यांना हिंदी आणि इंग्रजी या शिक्षणाच्या मुख्य भाषा येत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना इग्नू किंवा इतर विद्यापीठांमध्ये शिक्षण घेताना अडचणीचा सामना करावा लागत होता. अनेक विद्यार्थ्यांना इच्छा असूनही भाषेच्या अडथळ्यामुळे त्यांच्या आवडीनुसार अभ्यासक्रमांना प्रवेश घेता आला नाही. परंतु आता त्यांना इग्नूमधून त्यांच्या मातृभाषेत शिक्षण घेण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे त्यांचा भाषेचा अडथळा दूर झाला आहे. या 13 प्रादेशिक भाषांमध्ये अभ्यासक्रमाचे साहित्यही तयार केले जात असून, ते पुढे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाईल.
'स्वयम्' चॅनेलद्वारे विनामूल्य अभ्यासक्रम : कुलगुरूंनी पुढे माहिती दिली की, शिक्षण मंत्रालयाच्या 'स्वयम्' चॅनेलद्वारे चालवल्या जाणार्या सुमारे 3,000 ऑनलाइन अभ्यासक्रमांपैकी IGNOU सध्या 190 अभ्यासक्रम प्रदान करत आहे. विद्यार्थी यापैकी कोणत्याही अभ्यासक्रमातील एका विषयाचा देखील अभ्यास करू शकतात. त्यांनी सांगितले की, हे सर्व अभ्यासक्रम विनामूल्य असून नोंदणी होताच प्रवेश दिला जातो. नंतर, त्यांची राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) द्वारे परीक्षा घेतली जाते. यामध्ये फक्त परीक्षा शुल्क भरावे लागते. कोणताही इच्छुक विद्यार्थी 'स्वयम्' या पोर्टलवर नोंदणी करून या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ शकतो.
हेही वाचा :
- CUET Exam Result : काय सांगता! 'या' परीक्षेत तब्बल 22 हजार विद्यार्थ्यांनी मिळवले पैकीच्या पैकी गुण!
- Jammu Kashmir : घरात कोणीच नव्हते डॉक्टर; जम्मू काश्मीरच्या तीन बहिणींनी नीटमध्ये फडकावला झेंडा
- Talathi Bharti 2023 : महाराष्ट्रमध्ये 4 हजार 625 जागांसाठी तलाठी पदांची मेगा भरती, जाणून घ्या पात्रता अन् महत्त्वाची तारीख