पणजी (गोवा) -भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFI) 53व्या आवृत्तीला रविवारी गोव्यात सुरुवात झाली. (IFFI 2022 Inaugurated in Goa). IFFI 2022 च्या उद्घाटन समारंभात ज्येष्ठ लेखक विजयेंद्र प्रसाद, ज्येष्ठ अभिनेते परेश रावल, अभिनेते अजय देवगण, सुनील शेट्टी आणि मनोज बाजपेयी यांच्यासह चित्रपट उद्योगातील अनेक सदस्यांना विशेष सन्मान देऊन गौरविण्यात आले.
IFFI 2022 : 'इफ्फी'चे गोव्यात धमाकेदार उद्घाटन, 'या' कलावंतांचा विशेष सन्मान
नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवाच्या ५३ व्या आवृत्तीचे (IFFI 2022) उद्घाटन माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांच्या हस्ते करण्यात आले.
अनुराग ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन -नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवाच्या ५३ व्या आवृत्तीचे उद्घाटन माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार स्वीकारताना अजय देवगण म्हणाला, "मला चित्रपट बनवायला आवडते. अभिनय असो, निर्मिती असो किंवा दिग्दर्शन असो, मला चित्रपटांचे प्रत्येक पैलू आवडतात. प्रेमाबद्दल तुम्हा सर्वांचे आभार." उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिनेता अपारशक्ती खुराना यांनी केले.
देशभरातील लोकांसाठी व्यासपीठ -समारंभाच्या पार्श्वभूमीवर अनुराग ठाकूर म्हणाले, "यावर्षी येथे बरेच प्रीमियर होत आहेत. अनेक नवीन उपक्रम घेतले गेले आहेत. यावेळी '75 क्रिएटीव्ह माइंड' साठी 1,000 एंट्री आल्या. 10 क्षेत्रांमधून '75 क्रिएटीव्ह माइंड'ची निवड करण्यात आली. दुर्गम भागातील लोकांनी सुद्धा यात सहभाग घेतला. '75 क्रिएटीव्ह माइंड' अशा लोकांसाठी आहेत ज्यांना मुंबईत येण्याची भीती वाटत होती. आता त्यांच्या गरजा पूर्ण केल्या जात आहेत आणि मुख्य प्रवाहातील चित्रपट उद्योगात सहभागी होण्यासाठी सर्वांना संधी उपलब्ध करून दिली जात आहे. हे इफ्फी केवळ मुंबई फिल्म इंडस्ट्रीच नाही तर देशभरातील लोकांनी एकत्र येऊन काम करावे असे व्यासपीठ आहे. OTT प्लॅटफॉर्म शोचा सीझन प्रीमियर देखील यावेळी होणार आहे."