महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Snake In Dreams : स्वप्नात साप दिसला तर 'असे' करा उपाय; नक्कीच परिणाम जाणवतील - शिवलिंगाला चांदीचे नाग अर्पण

जर तुम्हाला स्वप्नात साप दिसत असेल तर खाली दिलेले उपाय करून पहावेत. नागपंचमीच्या ( Nagpanchami ) दिवशी उपवास ठेवून आठ नागांची पूजा करावी ( worshipped Eight snakes ). त्यासाठी महादेव आणि माता पार्वतीची मूर्ती ( Lord Mahadev and Parvati ) आणि नागदेवतेचे चित्र मंदिरासमोर ठेवावे. त्यानंतर त्यावर हळद, कुंकू, रोळी चंदन, तांदूळ आणि फुले अर्पण करावीत. कच्च्या दुधात तूप आणि साखर मिसळून प्रथम शिवाला आणि नंतर नागाला अर्पण करा. मग नागपंचमीची कथा ऐका आणि आयुष्यात झालेल्या चुकांसाठी नागदेवतेची माफी मागा. यानंतर आरती गाऊन संध्याकाळी उपवास सोडावा.

SNAKE IN YOUR DREAM
स्वप्नात साप

By

Published : Jul 31, 2022, 4:55 PM IST

Updated : Aug 1, 2022, 10:01 PM IST

रायपूर -जर तुम्हाला स्वप्नात साप दिसला तर ते शुभ चिन्ह मानले जात नाही ( snake repeatedly in dream is not good sign ). स्वप्न पाहणे ही चांगली गोष्ट आहे. पण जर एखादे स्वप्न वारंवार येत असेल तर याचा अर्थ असा होतो की स्वप्न तुम्हाला काही संकेत देण्याचा प्रयत्न ( dream try to give clues ) करत आहे. या स्वप्नांचा वैज्ञानिक आणि धार्मिक दृष्ट्या काही अर्थ आहे. विज्ञान तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना जाणून घेऊन या स्वप्नांचे विश्लेषण करते आणि त्यांना त्या घटनांशी जोडते. त्याचबरोबर धार्मिकदृष्टया शुभ आणि अशुभ स्वप्ने पाहिली जातात आणि स्वप्नांच्या आधारे व्यक्तीला जीवनातील आव्हानांची जाणीव ( dreams are Awareness of challenges ) करून दिली जाते. जर तुम्हाला स्वप्नात वारंवार साप दिसला तर ज्योतिष शास्त्रानुसार ते शुभ चिन्ह मानले जात नाही. या स्वप्नाचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी आणि या स्वप्नापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला काही उपाय अवश्य करावे लागतील. 13 ऑगस्ट रोजी नागपंचमीचा दिवस आहे. साप स्वप्नापासून मुक्ती मिळवण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी काही खास उपाय करू शकता.

व्रतपूजा कशी करावी -नागपंचमीच्या ( Nagpanchami ) दिवशी उपवास ठेवून आठ नागांची पूजा करावी ( worshipped Eight snakes ). त्यासाठी महादेव आणि माता पार्वतीची मूर्ती ( Lord Mahadev and Parvati ) आणि नागदेवतेचे चित्र मंदिरासमोर ठेवावे. त्यानंतर त्यावर हळद, कुंकू, रोळी चंदन, तांदूळ आणि फुले अर्पण करावीत. कच्च्या दुधात तूप आणि साखर मिसळून प्रथम शिवाला आणि नंतर नागाला अर्पण करा. मग नागपंचमीची कथा ऐका आणि आयुष्यात झालेल्या चुकांसाठी नागदेवतेची माफी मागा. यानंतर आरती गाऊन संध्याकाळी उपवास सोडावा.

काल सर्प दोषापासून मुक्ती मिळवा -चांदीच्या नागाची जोडी ( pair of silver snakes ) बनवा आणि स्वस्तिक ( swastika ) बनवा. त्यानंतर हे चांदीचे नाग एका ताटात ठेवा आणि स्वस्तिक दुसऱ्या थाळीत ठेवा. त्यांची पूजा करा. चांदीच्या नागांना कच्चे दूध अर्पण करा. स्वस्तिकावर बेलची पाने अर्पण करा. यानंतर नाग गायत्री मंत्राचा जप 'ओम नागकुलय विद्महे विषदन्तै धीमाह तन्नो सर्पः प्रचोदयात' किमान १०८ वेळा करावा. यानंतर मंदिरात जाऊन शिवलिंगाला चांदीचे नाग अर्पण करा ( Offer silver snake to Shivalinga ) आणि गळ्यात स्वस्तिक घाला. नागपंचमीच्या दिवशी हा उपाय अनेक समस्यांपासून वाचवू शकतो. हे देखील एक अतिशय प्रभावी उपाय मानले जाते. यामुळे सापाशी संबंधित कोणतीही समस्या दूर होईल, तसेच जर तुमच्या कुंडलीत काल सर्प दोष असेल तर तुम्हाला त्यापासूनही मुक्ती मिळेल.

हेही वाचा -Commonwealth Games 2022 : वेटलिफ्टर संकेतने भारताला मिळवून दिले पहिले पदक, दुखापतीमुळे सुवर्णपदक हुकले

Last Updated : Aug 1, 2022, 10:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details