महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Don't Search These Things On Google : गुगलवर चुकूनही शोधु नका 'या' गोष्टी, नाहीतर पोलिस तुम्हाला शोधत येतील - गुगलवर या गोष्टी शोधू नका

आपण गुगलवर काहीही शोधल्यास लगेच माहिती मिळते. मात्र गुगल वर पुढील काही गोष्टी शोधणे तुम्हाला महागात पडू शकते. जाणुन घेऊया कोणकोणत्या आहेत, त्या गोष्टी.

Don't Search These Things On Google
गुगलवर चुकूनही शोधु नका या गोष्टी

By

Published : Jan 14, 2023, 6:16 PM IST

गुगल हे एक सर्च इंजीन आहे. यावर तुम्हाला वाट्टेल ते तुम्ही शोधु शकता. गुगल मुळे जगणे सोपे झाले आहे, असे म्हणटल्यास वावगे ठरणार नाही. जगातली अशी कुठलीच गोष्ट नाही, जी गुगल वर सर्च होत नाही. जगातल्या जवळपास सगळ्याच गोष्टींची इत्यंभूत माहिती गुगल वर आहे. अगदी लहान मुलांपासुन ते मोठ्यापर्यंतची सगळीच कामे ही गुगलवर होतात. मात्र, तुम्हाला माहिती आहे का? काही अश्या गोष्टी आहेत, ज्या गुगलवर शोधल्यास तुम्ही अडचणीत सापडू शकता. केवळ एवढेच नव्हे तर, पोलिस देखील तुमचा शोध घेऊ शकते. जाणुन घेऊया 'त्या' गोष्टी कोणत्या ते.

1. बॉम्ब कसा बनवायचा? किंवा प्रेशर कुकर बॉम्ब कसा बनवायचा? याचा शोध तुम्ही गुगलवर घेतल्यास पोलिस तुम्हाला पकडून नेऊ शकतात. गुगल वरील सुरक्षा सेवा देणारी टिम अशा हानिकारक घटकांचा शोध घेत असते आणि असे संशयास्पद काही आढळल्यास, ते त्याची माहिती पोलिसांना कळवतात. त्यामुळे तुम्ही अश्या समाजविघातक घटकांचा शोध गुगलवर कधीही घेऊ नका.

2. चाइल्ड पोर्नोग्राफी आणि बाल लैंगिक शोषणाचे व्हिडिओ बघणे गुन्ह्याच्या क्षेत्रात येत असते. असले व्हिडिओ बघणे किंवा डाउनलोड करणे म्हणजे, पोलिसांना आमंत्रण देण्यासारखे आहे. तसे पॉर्न साईट्स बघणे सध्यातरी भारतात गुन्हा नाही. मात्र काही पॉर्न साईट्सवर कायद्याने बंदी घातली आहे. तेव्हा या साईट्स गुगलवर सर्च झाल्याचे कळताच, पोलिस तुमचा शोध घेऊ शकतात.

3. काही गुन्ह्यांशी संबंधित प्रश्न शोधणे म्हणजे पोलिसांचा त्रास स्वत:हून विकत घेण्यासारखे आहे. जसे की, अपहरण, अंमली पदार्थ यांसारख्या गोष्टींचा शोध घेणे. किंवा या गोष्टी कश्या केल्या, जातात याची माहिती गुगलवर सर्च करणे कायद्याने गुन्हा आहे. कारण या गोष्टी बघुन तसे कृत्य करण्यास मानवी मेंदू प्रेरित होत असतो, त्यामुळे कायद्याने यावर बंदी घातली आहे.

4. गर्भपाताशी संबंधित विषय वारंवार गुगलवर शोधणे, हे देखील एक समस्या आहे. आपल्या देशात वैद्यकीय गर्भपाताचे कठोर नियम आहेत. तेव्हा गर्भपाताशी संबाधित तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास, पोलिसांना तुमच्यावर संशय येऊ शकतो. बाल वयात लैंगिक शोषण झालेल्या मुलींचे गुगलवर माहिती घेऊन परस्पर गर्भपात करण्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. परंतु, असे करणे कायद्याने गुन्हा ठरते, शिवाय त्या मुलीचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे असे केल्यास अनेक कलमान्वये संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो.

ABOUT THE AUTHOR

...view details