महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 5, 2021, 10:27 PM IST

ETV Bharat / bharat

TOOLKIT आवडत नसल्यास दुर्लक्ष करा, सर्वोच्च न्यायालयाचा याचिकाकर्त्याला सल्ला

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचुड आणि न्यायमूर्ती एम. आर. शाह यांनी टूलकिट म्हणजे राजकीय प्रोपागंडा असल्याचे म्हटले आहे. वकील शंशाक शेखर झा यांनी देशविरोधी कृत्यामुळे काँग्रेस पक्षाची मान्यता रद्द करा, अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली - काँग्रेसच्या टूल किट प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेला तपास करण्याचे आदेश द्यावी, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे काँग्रेसला दिलासा मिळाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचुड आणि न्यायमूर्ती एम. आर. शाह यांनी टूलकिट म्हणजे राजकीय प्रोपागंडा असल्याचे म्हटले आहे. वकील शंशाक शेखर झा यांनी देशविरोधी कृत्यामुळे काँग्रेस पक्षाची मान्यता रद्द करा, अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती.

श्री. शंशाक झा, जर तुम्हाला टूलकिट आवडत नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करा. हा राजकीय पक्षाचा प्रोपागंडा आहे. त्याकडे तुम्ही दुर्लक्ष केले पाहिजे, असे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचुड यांनी याचिकार्त्याला म्हटले आहे.

वकील झा यांनी सिंगापूरच्या न्ययालयाने बंदी लागू केल्याचे उदाहरण दिले. त्यावर न्यायमूर्ती यांनी भारत ही लोकशाही असल्याचे उदाहण दिले आहे. न्यायालयाचा वेळ अनमोल आहे. अशा सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाचा वेळ घालवितात, असे पीठाने निरीक्षण नोंदविले. याचिकाकर्त्याला पर्याय उपाय शोधण्याची सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.

हेही वाचा-Guidelines for Schools : आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार; वाचा मार्गदर्शक सूचना

टूलकिटमुळे निर्माण झाला होता वाद

संबित पात्रा यांनी १८ मे २०२१ रोजी एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी काँग्रेस पक्ष एका टूलकिटद्वारे कोरोना संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला होता. तसेच काँग्रेस टूलकिटच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण करत असल्याचेही त्यांनी म्हटले होते. या ट्विटमध्ये एक पत्रदेखील देण्यात आले होते. ज्यावर काँग्रेस पक्षाच्या लेटरहेडवर सोशल मीडियावर कसे ट्वीट करायचे, तसेच कोणती माहिती वापरायची याबद्दल माहिती होती.

हेही वाचा-VIDHANSABHA RADA : ऐका, चेंबरमधील प्रकारावर काय म्हणाले नवाब मलिक

काँग्रेसने हे दिले उत्तर-

काँग्रेसने टूलकिटची तयार केलेली दावा करणारी कागदपत्रे बनावट आहेत. ही कागदपत्रे भाजपच्या नेत्यांनी तयार केली आहेत. चुकीच्या पद्धतीने राजकीय लाभ मिळविण्यासाठी राजकीय धोकादायक, चुकीची आणि भेसळ केलेली माहिती पसरविली जात असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. त्यांनी ट्विटमध्ये केंद्रीय मंत्री शांडिल्य गिरीराज सिंह, पीयूष गोयल, स्मृती इराणी, रवीशंकर प्रसाद, प्रल्हाद जोशी, धर्मेंद्र प्रधान, रमेश पोखरियाल निशांक, थवारचंद गेहलोत, डॉ. हर्ष वर्धन, मुख्तार अब्बास नक्वी आणि गजेंद्र सिंह शेखावत यांचे ट्विट देण्यात आलेले होते.

हेही वाचा-Goldprice सोन्यासह चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

टूलकिट म्हणजे काय?

  • टूलकिट एक पुस्तिका किंवा डॉक्युमेंट असते. कारण किंवा समस्येचे स्पष्टीकरण देण्यासाठी ती तयार केली जाते. एखादी मोहीम टिकवून ठेवण्यासाठीचा तो एक मौल्यवान स्त्रोत आहे. मोहिमेसाठी कृती करण्याच्या योजनेचाही यात समावेश असू शकतो.
  • एखादी समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवल्यास त्यासंबंधी व्यावहारिक सल्ला आणि मार्गदर्शन प्रदान करण्याच्या दस्तावेजांना टूलकिट म्हटले जाते. विशेषत: जेव्हा समस्या उद्भवत आहे किंवा विकसित होत आहे, अशावेळी टूलकिटचा वापर होतो.
  • एखाद्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी काय करावे लागेल याची माहितीदेखील टूलकिट प्रदान करू शकते. या दस्तावेजात मूलभूत समस्या, याचिका, निषेधाचा तपशील आणि आजूबाजूच्या हालचालींविषयी माहिती असू शकते.

ABOUT THE AUTHOR

...view details