हैदराबाद ( तेलंगणा ) : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांनी म्हटले आहे की, मोदी सरकार राज्य सरकारांना त्रास देण्याचे काम करत ( KCR Criticized BJP ) आहे. मोदी सरकारवर निशाणा साधत ते म्हणाले की, जर त्यांनी (भाजपवाल्यांनी) तेलंगणातील सरकार ( TRS government ) पाडले तर, आम्ही त्यांना दिल्लीतून बाहेर काढू. हैद्राबाद येथील जलविहार येथे विरोधी पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या समर्थनार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
सभेत केसीआर म्हणाले की, तेलंगणाने 60 वर्षे लढा दिला आहे आणि दुसर्या लढ्यापासून मागे हटणार नाही. नव्या भारताच्या उभारणीसाठी आम्ही पुन्हा पुढे जाऊ, असे ते म्हणाले. एवढेच नाही तर ते (भाजप) देशात द्वेष पसरवण्याबरोबरच देशाचे भविष्य उद्ध्वस्त करत आहेत. आपल्या भाषणादरम्यान ते म्हणाले की, मोदी सरकार राज्य सरकारांना त्रास देत आहे.