नवी दिल्ली - जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क हे ट्विटर विकत घेतल्यानंतर सतत चर्चेत असतात. त्यांचे एक नवीन ट्विट सध्या चर्चेत आहे. यामध्ये त्यांनी 'संशयास्पद परिस्थितीत मृत्यू' याविषयी बोलले आहे. ( Elon Musk Tweet ) त्यांच्या या ट्विटवर लोकांच्या उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने लिहिले की नाही, तू मरणार नाहीस. जगाला तुमच्या सुधारणेची गरज आहे.
इलॉन मस्क यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'जर माझा मृत्यू रहस्यमय परिस्थितीत झाला तर ते तुम्हाला चांगलेच माहीत असेल. मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटर विकत घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मस्कचे ट्विट जवळजवळ एक आठवड्यानंतर आले आहे.
इलॉन मस्कने मृत्यूबद्दल थेट ट्विट केले आहे. परंतु, मस्कला काय म्हणायचे आहे याचा अर्थ कोणालाच समजला नाही, पण इथे मस्क नीस नोविन या या गाण्याचा संदर्भ देत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ( Elon Musk Tweet On Death ) मस्कने ज्या गाण्याचा उल्लेख केला आहे ते TWENTY2 नावाच्या बँडचे आहे.