Mamata Banerjee : काँग्रेसची इच्छा असेल २०२४ लोकसभा निवडणुका एकत्र लढू - ममता बॅनर्जी - पाच राज्यातील निवडणूक निकालावर ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया
काँग्रेसची इच्छा असेल तर आपण सर्वजण मिळून २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका लढू शकतो, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. गोवा, पंजाब, मनिपूर, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडया पाच राज्यातील निवडणूक ( WB CM Mamata Banerjee on 2024 general elections ) निकाल हाती आल्यानंतर त्यांनी हे मोठे विधान केले आहे.
ममता बॅनर्जी
By
Published : Mar 11, 2022, 3:52 PM IST
कोलकाता -पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी घोषणा ( WB CM Mamata Banerjee on 2024 general elections ) केली आहे. काँग्रेसची इच्छा असेल तर आपण सर्वजण मिळून २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका लढू शकतो, असे त्यांनी म्हटलं आहे.
सध्या आक्रमक होऊ नका, सकारात्मक व्हा. चार राज्यातील विधानसभा निवडणुकांमधील विजय हा भविष्यात भाजपसाठी मोठे नुकसानदायक ठरणार आहे. 2022 निवडणूक निकाल 2024 निवडणुकांचे भवितव्य ठरवतील, असे ममता यांनी म्हटलं आहे.
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी निराश होऊ नये आणि त्याच ईव्हीएम मशीनच्या फॉरेन्सिक चाचण्या घ्याव्यात. यावेळी अखिलेश यादव यांच्या मतांची टक्केवारी 20% वरून 37% पर्यंत वाढली असल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं.
नुकतेच गोवा, पंजाब, मनिपूर, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल 10 मार्चला लागले आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. तर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मनिपूर आणि गोवा या चार राज्यात भाजपाला सर्वाधिक मते मिळाली आहेत. या चारही राज्यात भाजापा सत्ता स्थापन करेल, अशी चिन्हे आहेत.