लोक आज खाजगी क्षेत्रात झपाट्याने नोकऱ्या (If Changing jobs) बदलत आहेत. तुम्ही नवीन कंपनी जॉईन करता, तेव्हाच तुमचा पूर्वीचा UAN नंबर वापरून नवीन पीएफ खाते उघडले जाते. मात्र, नवीन पीएफ खात्यात जुन्या कंपनीच्या टाईम फंडाचा समावेश नसतो. म्हणून, खाते विलीन (merge your PF account) करण्यासाठी पीएफ खातेधारकाने ईपीएफओच्या वेबसाइटवर जाणे आवश्यक आहे (EPF Account Merger). यानंतरच, तुम्ही तुमच्या ईपीएफ (EPFO guidelines) खात्यात जमा झालेली एकूण रक्कम, एकाच खात्यात पाहू शकाल. Utility News
पीएफ खाते कसे विलीन करावे? :पीएफ खाती सहजपणे ऑनलाइन विलीन करता येतात. विलीनीकरणासाठी या माहितीचे अनुसरण करा. सगळ्यात आधी ईपीएफओ च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. त्यात 'सेवा' पर्याय निवडा. 'एक कर्मचारी-एक EPF खाते' वर क्लिक करा. टॅबवर एक नवीन फॉर्म दिसेल. पीएफ खातेधारकाचा फोन नंबर, UAN क्रमांक आणि वर्तमान सदस्य आयडी हे तपशील प्रविष्ट करा. यानंतर, तुम्हाला नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक OTP प्राप्त होईल. पोर्टलमध्ये ओटीपी टाका, आता तुम्ही तुमचे जुने पीएफ खाते पाहू शकाल. पीएफ खाते क्रमांक भरा आणि घोषणा स्वीकारा. त्यानंतर सबमिट वर क्लिक करा. पडताळणी झाल्यानंतर. तुमचे खाते काही दिवसांनी विलीन केले जाईल.