अमरावती :सुपरस्टार रजनीकांत यांनी चंद्राबाबू नायडूंवर स्तुतीसुमने उधळली आहेत. चंद्राबाबूंचे विचार अमलात आणले तर आंध्रप्रदेश विकासात देशात अव्वल होईल, असे सुपरस्टार रजनिकांत यांनी स्पष्ट केले आहे. हैदराबाद शहराला न्यूयॉर्क शहरासारखे बनवण्यासाठी चंद्राबाबूंनी खूप प्रयत्न केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्यामुळे लाखो तेलुगू लोक विदेशात आयटी क्षेत्रात काम करत आहेत. चंद्राबाबूंनी तयार केलेले व्हिजन 2047 हा एक चमत्कार असून तो अमलात आणल्यास आंध्र प्रदेश देशात अव्वलस्थानी उभा राहील, असे ते म्हणाले.
आंतरराष्ट्रीय राजकारणांची जाण :एनटीआरच्या शताब्दी सोहळ्याच्या कार्यक्रमात सुपरस्टार रजनीकांत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी 24 तास नागरिकांचे भले करणारा नेता म्हणून चंद्राबाबू नायचडूंचा विचार आहे. त्यांना केवळ राष्ट्रीय राजकारणच नाही, तर आंतरराष्ट्रीय राजकारणाचीही जाण आहे. देशातील बड्या राजकीय नेत्यांना त्यांच्याबाबत माहीत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
चंद्राबाबूंनी वर्तवले होते आयटीचे भविष्य :चंद्राबाबू यांनी 1996 - 97 मध्ये त्यांचे व्हिजन 2020 असल्याबाबत सांगितले होते. त्यांनी आयटीचे भविष्य वर्तवले. तेव्हा त्यांनी ज्या डिजिटल जगाचा उल्लेख केला, त्याची कल्पना कोणीही करू शकत नाही. नंतर हैदराबादचे हायटेक शहरात रूपांतर झाले. बिल गेट्ससारखे दिग्गज आले आणि त्यांनी येथे कंपन्या सुरू केल्या. ते नेहमी आंध्र प्रदेशच्या विकासाचा विचार करतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आंध्र प्रदेश देशात खूप पुढे जाईल :मी कुठेही असलो तरी तो चंद्राबाबू मला फोन करुन माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. चार महिन्यांपूर्वी मला त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली. आंध्र प्रदेशसाठी दीर्घकालीन योजना आखल्या जात आहेत. जर तो प्रकल्प कार्यान्वित झाला तर आंध्र प्रदेश देशात खूप पुढे जाईल असेही रजनिकांत यांनी यावेळी सांगितले. या सर्व गोष्टी घडाव्यात आणि ईश्वर त्यांना विकास कामे करण्याची शक्ती देवो अशा सदिच्छाही रजनिकांत यांनी यावेळी व्यक्त केल्या.
हेही वाचा - Mafia Mukhtar Ansari Sentenced : मुख्तार अंसारीचा झाला फैसला, न्यायालयाने ठोठावली दहा वर्षाची शिक्षा