कोलकाता : देशातील मुस्लिम लोक जर एकत्र आले, तर चार पाकिस्तान तयार होऊ शकतील असे वक्यव्य एका तृणमूल नेत्याने बुधवारी केले. शेख आलम असे या नेत्याचे नाव आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले.
..तर चार नवे पाकिस्तान होतील
"आपण ३० टक्के आहोत, आणि ते ७० टक्के आहेत. या ७० टक्के लोकांच्या पाठिंब्याने जर ते सत्तेत आले तर त्यांना लाज वाटायला हवी. जर आम्ही सर्व मुस्लिम लोक एकत्र आलो, तर चार नवे पाकिस्तान तयार होतील, मग हे ७० टक्के लोक कुठे जातील?", असे वक्तव्य त्यांनी केले होते. भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी शेख यांचा हा व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर केला आहे.
ममतांमुळेच हे नेते पाहतात चार पाकिस्तानचे स्वप्न..
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मालवीय यांनी ममता बॅनर्जींवर टीका केली. ममता यांनी राज्यातील बहुसंख्य लोकांना सुमार दर्जाचे नागरिक बनवल्याचा आरोप त्यांनी केला. केवळ ममता बॅनर्जींच्या निर्लज्ज राजकारणामुळेच शेख आलम यासारखे नेते चार पाकिस्तानचे स्वप्न पाहू शकतात. यामुळेच राज्यातील बहुसंख्या लोकांवर अगदी दुर्गा विसर्जनासाठीही परवानगी मागण्याची वेळ आली आहे; असे ट्विट मालवीय यांनी केले.
दरम्यान, बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुकांसाठी आठ टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. २७ मार्च ते २९ एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया चालेल. त्यानंतर २ मे रोजी मतमोजणी पार पडेल.
हेही वाचा :100 कोटीच्या वसुलीचा हिशोब द्या, ज्योतिरादित्य सिंधिया यांचा महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल