नवी दिल्ली- भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत चाचणींसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. जर आरएटी अथवा आरटीपीसीआरमधून कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली तर पुन्हा आरटीपीसीआर चाचणी करू नये, असे आयसीएमआरने म्हटले आहे.
कोरोनाबाधितांचे देशात अभूतपूर्व प्रमाण वाढत असताना लॅबवर ताण वाढला आहे. देशभरात पॉझिटिव्हिटीचे प्रमाण २० टक्के आहे. देशात एकूण २५०६ मॉलेक्युलर चाचणीच्या लॅब आहेत. त्यामध्ये आरटीपीसीआर, ट्रूनॅट आदींचा समावेश आहे. योग्य अशा परिस्थितीत कोरोना चाचण्या करण्यासाठी आयसीएमआरने काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
हेही वाचा-तुम्ही शहामृगाप्रमाणे वाळूत मान खुपसू शकता, आम्ही नाही- उच्च न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
या आहेत आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचना
जर देशांतर्गत प्रवास करणारा व्यक्ती निरोगी असेल तर आरटी-पीसीआर चाचणी पूर्णपणे वगळावी, असे आयसीएमआरने सूचविले आहे. सौम्य लक्षणे असलेल्या नागरिकांनी कोरोनाच्या काळातील सर्व नियमांचे पालन करावे, असे आयसीएमआरने म्हटले आहे. टेस्ट-ट्रॅकिंग, ट्रेसिंग, विलगीकरण (आयसोलेशन) आणि गृहविलगीकरणावर भर द्यावा, यावर आयसीएमआरने भर द्यावा, असे सूचविले आहे. कोरोनाचा संसर्ग कमी करण्याकरता याची गरज असल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे.
देशभरात दररोज कोरोनावरील १५ लाख चाचणी करण्याची क्षमता आहे. मात्र, कोरोनाबाधितांची समस्या रोज वाढत असल्याने लॅबवर ताण वाढल्याचेही आयसीएमआरने म्हटले आहे.
हेही वाचा-राजकारणातील करियरचे स्वप्न भंग; मिस इंडियातील स्पर्धक दिक्षाचा पंचायत निवडणुकीत पराभव
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात साडेतीन लाखांहून कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. कोरोनाबाधितांच्या मृत्युंचा आकडाही घाबरून टाकणार आहे.