महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

टीबीच्या लसींची परिणामकारकता अभ्यासण्यासाठी चाचण्या - शास्त्रज्ञ डॉ सुचित कांबळे

क्षयरोग- टीबीच्या दोन लसींची परिणामकारकता आणि सुरक्षितता अभ्यासण्यासाठी (To study the effectiveness of TB vaccines) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद एक बहुकेंद्रीय चाचणी (ICMR is conducting a multicentral trial) घेत आहे.

Dr. Suchit Kamble
डॉ सुचित कांबळे

By

Published : Apr 1, 2022, 12:24 PM IST

नवी दिल्ली: सध्या, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद - आयसीएमआर मुख्यालय व्हीपीएम 1002 आणि आयएमएमयूव्हीएसी या दोन क्षयरोग लसींची परिणामकारकता आणि सुरक्षिततेचा अभ्यास करण्यासाठी (To study the effectiveness of TB vaccines) एक बहुकेंद्रीय चाचणी (ICMR is conducting a multicentral trial) घेत आहे. हीचाचणी भारतातील 18 ठिकाणी सहा वेगवेगळ्या राज्यांमध्ये करण्यात येणार आहे अशी माहिती शास्त्रज्ञ डॉ सुचित कांबळे (Scientist Dr. Suchit Kamble) यांनी दिली आहे.त्यांनी सांगितलेकी, महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, तेलंगणा आणि ओडिशा येथे या चाचण्या केल्या जाणार आहेत. आयसीएमआरच्या साइटवर फेब्रुवारी 2024 मध्ये शेवटची नावनोंदणी होईल आणि नंतर आम्हाला अंतिम निकाल मिळू शकेल. चाचण्यांमध्ये सहभागी असलेले सहभागी सहा वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे आहेत


क्षयरोग हा मायकोबॅक्‍टेरियम टयुबरक्‍युलॉसिस नावाच्‍या जीवाणुंमुळे होणारा आजार आहे. तो मुख्‍यत्‍वे करुन फुफुसाचा आजार आहे. तो मज्‍यासंस्‍था, रक्‍ताभिसरण संस्‍था, त्‍वचा, हाडे अशा शरीराच्‍या इतर अवयावांनाही होवू शकतो.ज्‍यावेळेस क्षयरोगाचा जीवाणु श्‍वासावाटे फुफुसात प्रवेश करतो, तेथे त्‍यांची संख्‍या वाढते. नंतर काही दिवसांनी त्‍या व्‍यक्‍तीला क्षयरोगाची लक्षणे दिसायला लागतात. याला आपण फुफुसाचा क्षयरोग म्‍हणतो. फुफुसातुन काही रुग्‍णांमध्‍ये या जीवाणुंचा प्रसार शरीराच्‍या इतर भागात होवून हा आजार पसरु शकतो. लहान मुले व एचआयव्‍हीग्रस्‍त रुग्‍ण यामध्‍ये हा क्षयरोग गंभीर स्‍वरुप धारण करतो.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details