महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ICMR DEVELOPS SPECIAL MOSQUITOES: आयसीएमआरचे भन्नाट संशोधन; आता डासच करणार डेंग्यू चिकनगुनियाचे नियंत्रण

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, डेंग्यू हा जगभरात डासांमुळे पसरणारा आजार आहे. डास हा जगातील सर्वात प्राणघातक कीटक आहे. डास चावण्यामुळे पसरणाऱ्या रोगांनी जगात दरवर्षी सुमारे ४ लाख लोकांचा मृत्यू होतो. आता डासच डेंग्यू आणि चिकनगुनियावर (Aedes aegypti) नियंत्रण आणतील असे संशोधन (ICMR) करण्यात आले आहे.

आता डासच करणार डेंग्यू चिकनगुनियाचे नियंत्रण
आता डासच करणार डेंग्यू चिकनगुनियाचे नियंत्रण

By

Published : Jul 7, 2022, 11:49 AM IST

पुद्दुचेरी: भारतात डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. दरवर्षी पावसाळ्यात दोन्ही आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. आता मात्र या दोन्ही आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी डासांचे नवीन प्रकार विकसित करण्यात आले आहेत. या डासांमुळे डेंग्यू आणि चिकुनगुनिया मारणाऱ्या अळ्या निर्माण होतात.

आयसीएमआरचे संशोधन - मिळालेल्या माहितीनुसार, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या वेक्टर कंट्रोल रिसर्च सेंटर (VCRC) ने विशेष मादी डास ICMR DEVELOPS SPECIAL MOSQUITOES विकसित केले आहेत. या माद्या, नर डासांसोबत मिळून अशा अळ्यांना जन्म देतील, ज्यामुळे डेंग्यू-चिकुनगुनिया नाहीसा होईल. कारण त्यांच्यात या आजारांचे विषाणू नसतील. जेव्हा विषाणू नसतात, तेव्हा त्यांच्या चाव्याव्दारे मानवाला संसर्ग होणार नाही.

एडिस इजिप्तीच्या दोन नव्या प्रजाती - पुडुचेरीमधील ICMR-VCRC ने एडिस इजिप्तीच्या दोन प्रजाती (Aedes aegypti) विकसित केल्या आहेत. त्यांच्यामध्ये wAIbB आणि Wolbachia स्ट्रेन सोडण्यात आले. आता या डासांचे नाव एडीस इजिप्ती (PUD) आहे. या डासांमुळे डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा विषाणूजन्य संसर्ग पसरणार नाही. गेल्या चार वर्षांपासून व्हीसीआरसीमध्ये यावर काम करण्यात आले. जेणेकरून त्यांना वोल्बॅचिया डासांची उत्पत्ती होऊ शकेल.

सरकारी परवानगीची प्रतीक्षा - व्हीसीआरसीचे संचालक डॉ अश्विनी कुमार म्हणाले की, स्थानिक भागात डास सोडण्यासाठी अनेक प्रकारच्या सरकारी परवानग्या घ्याव्या लागतील. डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा नायनाट आणि नियंत्रण करण्यासाठी आम्ही विशेष प्रकारचे डास विकसित केले आहेत. आम्ही मादी डासांना बाहेर सोडू जेणेकरून ते या रोगांच्या विषाणूंपासून मुक्त असलेल्या अळ्या तयार करतील. या डासांना सोडण्यासाठी आमची तयारी पूर्ण झाली आहे. शासनाकडून परवानगी मिळण्याची प्रतीक्षा आहे. शासनाकडून परवानगी मिळताच आम्ही या विशेष मादी डासांना सोडू.

डब्ल्यूएचओची माहिती - जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, डेंग्यू हा जगभरातील डासांमुळे पसरणारा आजार आहे. डास हा जगातील सर्वात प्राणघातक प्राणी आहे. याच्या चाव्याव्दारे आणि त्यामुळे पसरणाऱ्या रोगांमुळे जगात दरवर्षी सुमारे ४ लाख लोकांचा मृत्यू होतो. यापैकी मुलांना सर्वात जास्त त्रास होतो. पाश्चात्य देशांतील शास्त्रज्ञही असे काम करत आहेत, ज्यामुळे जगातील डासांच्या प्रजाती कमी होतील. यासोबतच त्यांच्यापासून पसरणाऱ्या आजारांनाही आळा बसेल.

हेही वाचा - Betel Leaves : खायच्या पानांचे सेवन केल्याने अनेक रोग आणि समस्यांपासून होते सुटका

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details