महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आयसीएमआरच्या महासंचालकांना कोरोनाची लागण; एम्समध्ये उपचार सुरू - बलराम भार्गव यांना कोरोनाची लागण न्यूज

आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना उपचारासाठी एम्स रुग्णालयातील ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

ICMR Chief Balram Bhargava Tests Positive for COVID-19, Admitted To AIIMS
आयसीएमआरच्या महासंचालकांना कोरोनाची लागण; एम्समध्ये उपचार सुरू

By

Published : Dec 19, 2020, 2:23 AM IST

नवी दिल्ली -आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ५९ वर्षीय भार्गव यांना १६ डिसेंबर रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. या दरम्यान, त्यांना कोरोनाची लक्षणे दिसून आली. यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ती आता पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.

आयसीएमआरच्या महासंचालकपदासाठी बलराम भार्गव यांची नियुक्ती तीन वर्षांसाठी करण्यात आली आहे. यासोबतच ते स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत आरोग्य संशोधन विभागाचे सचिव देखील आहेत.

महाराष्ट्रात शुक्रवारी नवे ३ हजार ९९४ रुग्ण

शुक्रवारी राज्यात ३ हजार ९९४ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १८ लाख ८८ हजार ७६७ वर पोहोचला आहे. राज्यात आज ७५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४८ हजार ५७४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ टक्के एवढा आहे. राज्यात सद्यघडीला एकूण ६० हजार ३५२ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

हेही वाचा -यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आणखी एक संधी ?

हेही वाचा -सुशांतसिंह प्रकरण : अनेक तारे-तारकांच्या मोबाईलमधील डेटा हस्तगत, गुजरातच्या फॉरेन्सिक लॅबची घेतली मदत

ABOUT THE AUTHOR

...view details