र्मशाला ICC ODI World Cup 2023 BAN vs AFG :बांग्लादेशकडून नजमुल हुसैन शान्तो यानं ८३ चेंडूत सर्वाधिक ५९ धावांची खेळी केली. तर मेहंदी हसन मिराजनं ७३ चेंडूत ५७ धावा केल्या. मेहंदी हसन मिराजला सामनावीर घोषित करण्यात आलं.
अफगाणिस्तानला अवघ्या १५६ धावांवर रोखलं : बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत, अफगाणिस्तानला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. यानंतर अफगाणिस्तान संघानं सावध सुरुवात केली. त्यांची एकवेळ २० षटकांत २ बाद ९८ अशी अवस्था होती. मात्र त्यानंतर बांगलादेशच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत अफगाणिस्तानला ३७.२ षटकांत अवघ्या १५६ धावांवर रोखलं. अफगाणिस्तानकडून सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाजनं सर्वाधिक ४७ धावा काढल्या. तर बांगलादेशकडून कर्णधार शाकिब अल हसन आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.
दोन्ही संघात काटे की टक्कर : आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या तिसऱ्या सामन्यात आज बांगलादेश आणि अफगाणिस्तान आमनेसामने होते. धर्मशालाच्या एचपीसीए स्टेडियमवर हा सामना झाला. हे क्रिकेट स्टेडियम जगातील सर्वात सुंदर स्टेडियमपैकी एक मानलं जातं. अफगाणिस्ताननं या वर्षाच्या सुरुवातीला बांग्लादेशला मालिकेत २-१ नं पराभूत केलं होतं. मात्र बांग्लादेशनं आशिया चषक आणि विश्वचषकाच्या वॉर्मअप मॅचमध्ये अफगाणिस्तानचा पराभव केला होता. विशेष म्हणजे, बांग्लादेशनं २०१५ आणि २०१९ च्या विश्वचषकात आपला पहिला सामना जिंकला होता.