विश्वचषक ट्रॉफी रामोजी फिल्म सिटीत! हैदराबादICC ODI World Cup 2023 Trophy : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदनं (ICC) बुधवारी संध्याकाळी रामोजी फिल्म सिटी येथे ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 ट्रॉफीचं प्रदर्शन करण्यात आलं. रामोजी फिल्मसिटी संकुलातील कॅरम गार्डनमध्ये वर्ल्ड कप ट्रॉफी ठेवण्यात आली होती. रामोजी फिल्म सिटीचे व्यवस्थापकीय संचालकांच्या हस्ते या ट्रॉफीचं अनावरण विजयेश्वरी, ईनाडूचे संचालक चे. सहारी यांनी केलं. यावेळी ईनाडूचे व्यवस्थापकीय संचालक किरण, ईटीव्हीचे सीईओ बापी नायडू उपस्थित होते.
सेल्फीसाठी जमली गर्दी :ही ट्रॉफी पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांनी मोठी गर्दी केली. या कार्यक्रमादरम्यान चाहते टीम इंडियाचा जोरदार जल्लोष करताना दिसले. विश्वचषकाची ट्रॉफी रामोजी फिल्मसिटीत आणली तेव्हा लोकांचा जल्लोष ओसंडून वाहत होता. दुपारी 4:50 वाजता ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलं. त्यानंतर चाहत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी रामोजी फिल्मसिटीमध्ये फटाक्यांची आतषबाजीही पाहायला मिळाली. वर्ल्ड कपचे थीम साँग 'दिल जश्न-जश्न बोलेही' यावेळी वाजवण्यात आलं. त्यानंतर चाहत्यांनी ट्रॉफीसोबत सेल्फी घेण्याचा आनंद लुटला.
ट्रॉफीसोबत फोटो काढण्याची संधी : यावेळी बोलताना व्यंकटेश्वर गारू म्हणाले, रामोजी फिल्म सिटीत ट्रॉफी प्रदर्शित केल्याबद्दल आयसीसीचे खूप आभारी आहोत. तसेच 1983 चा विश्वचषक जिंकल्याबद्दल कपिल देव आणि 2011 चा विश्वचषक देशासाठी जिंकल्याबद्दल महेंद्रसिंग धोनीचे त्यांनी आभार मानले. यानंतर, आपला जुना काळ आठवत त्यांनी सांगितलं की, 1993 मध्ये त्यांच्या मुलीनं त्यांना आयसीसी ट्रॉफीसोबत फोटो काढण्यास सांगितलं होते. पण तेव्हा फोटो काढता आला नाही. आज आयसीसी विश्वचषक ट्रॉफीसोबत फोटो काढण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला रसिकांकडून प्रश्नोत्तरेही विचारण्यात आली. यादरम्यान चाहत्यांचे क्रिकेट सामान्य ज्ञानही तपासण्यात आलं. प्रत्येकानं त्यांचे आवडते क्रिकेटपटू, त्यांचे जीवन, वनडे विश्वचषकातील त्यांच्या योगदानाबद्दल सांगितलं. सर्व पाहुण्यांनी ट्रॉफीसोबत छायाचित्रे घेऊन कार्यक्रमाची सांगता केली.
काय आहे ट्रॉफीची विषेशता:यावेळी ट्रॉफीची माहितीही देण्यात आली. ही सध्याची ICC विश्वचषक ट्रॉफी 1999 मध्ये तयार करण्यात आली होती. ही ट्रॉफी 60 सेमी उंच आहे. यात तीन चंद्र स्तंभदेखील आहेत. ते फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचे प्रतिक आहेत. या ट्रॉफीच्यावर एक चेंडूदेखील आहे. या ट्रॉफीचं वजन 11 किलो आहे. त्याची किंमत 40,000 पौंड स्टर्लिंग (30,85,320) पेक्षा जास्त आहे.
हेही वाचा -
- ICC World Cup Trophy : रामोजी फिल्म सिटीमध्ये प्रदर्शित होणार आयसीसी विश्वचषक ट्रॉफी, जाणून घ्या ट्रॉफीबद्दल सर्वकाही
- IND Vs SL Final Match : भारतीय संघाकडून 'लंका पतन'; भारताचा 10 गडी राखून धडाकेबाज विजय, आशिया कपावर आठव्यांदा कोरलं नाव
- IND vs SL Asia Cup 2023 Final : आशिया चषकाच्या इतिहासात मोहम्मद सिराजनं रचला नवा इतिहास, जाणून घ्या कामगिरी