हैदराबाद : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC ) क्रिकेट नियमांमध्ये काही बदल केले आहेत आणि ते पुन्हा एकदा नव्याने लागू केले आहेत. दोन वर्षांपूर्वी कोरोनामुळे चेंडू चमकण्यासाठी लाळेच्या वापरावर क्रिकेटमध्ये तात्पुरती बंदी ( Ban on the use of saliva ) घालण्यात आली होती. आता तो नियम कायम करण्यात आला आहे.
सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली ( Sourav Ganguly leadership ) पुरुष क्रिकेट समितीने मेरीलेबोन क्रिकेट क्लबने ( Marylebone Cricket Club ) महिला क्रिकेट समितीशी केलेल्या नियमांवर चर्चा केली, नियमांमध्ये काही बदल केले आणि ते नव्याने लागू केले. नवीन नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत.
अशा प्रकारचे असतील बदलले नवीन नियम -
झेलबादचा नियम ( Catch out rule ): जेव्हा एखादा फलंदाज झेलबाद होतो, तेव्हा नवीन फलंदाज स्ट्राईकवर खेळायला येईल. बाद झालेल्या बॅट्समनने क्रीज बदलली किंवा न बदलली तर याचा काही परिणाम होणार नाही. पहिल्या नियमात फलंदाजाने झेलबाद होण्यापूर्वी स्ट्राईक बदलली तर नवीन फलंदाज नॉन स्ट्राइकवर येत होता.
लाळ वापरण्याचा नियम ( The rule of using saliva ): कोरोना महामारीमुळे 2020 च्या सुरुवातीपासून क्रिकेटवर परिणाम होऊ लागला होता. यानंतर लॉकडाऊनसोबतच जगभरात क्रिकेटही बंद झाले. मग पुन्हा खेळ सुरू करण्यासाठी काही नवीन नियम करण्यात आले होते. ज्यामध्ये लाळेच्या वापरावर तात्पुरती बंदी घालण्यात आली. मात्र आता क्रिकेट समितीनेही या नियमाचा विचार करून तो कायम केला आहे. म्हणजेच आता क्रिकेटमध्ये लाळेच्या वापरावर पूर्णपणे बंदी राहणार आहे. हा नियम आता कायमस्वरूपी होणार आहे.
नवीन फलंदाजासाठी स्ट्राइक घेण्याची वेळ ( Time for a new batsman to take a strike ) : जेव्हा एखादा खेळाडू बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज स्ट्राइकवर येतो, तेव्हा त्याला कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 2 मिनिटांच्या आत स्ट्राइकवर यावे लागेल. तर टी-20 इंटरनॅशनलमध्ये ही वेळ 90 सेकंदांची निश्चित करण्यात आली आहे.
बराच विचार केल्यानंतर या नियमात थोडा बदल करण्यात आला आहे. प्रथम नवीन फलंदाजाला तीन मिनिटांत स्ट्राइकवर यावे लागत असे. पण आता वेळ थोडा कमी झाला आहे. नवीन फलंदाज वेळेवर न आल्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा कर्णधार टॉइम आऊटसाठी अपील करू शकतो.