इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनने, स्पेशालिस्ट ऑफिसर प्रिलिमीनरी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. आज, 17 जानेवारी रोजी ibps.in या अधिकृत वेबसाइटवर स्पेशलिस्ट ऑफिसर पदांच्या भरतीसाठी घेतलेल्या प्रिलिम्स परीक्षेचा निकाल प्रसिद्ध केला आहे. तुम्हीही या परीक्षेला बसला असाल, तर तुम्ही येथे दिलेल्या थेट लिंकवरून परीक्षेचा निकाल डाउनलोड करू शकता.
स्कोअर तपासणी : आयबीपीएस एसओ प्रीलिम्स 2022 परीक्षा 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. उमेदवार आपल्या आयडी कार्डचा वापर करुन; आयबीपीएस एसओ प्रीलिम्स निकाल 2022 तपासू शकतात. यासाठी IBPS च्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर जा. मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या आयबीपीएस एसओ प्रीलिम्स निकाल 2022 (CRP SPL-XII) लिंकवर क्लिक करा. त्यामध्ये नोंदणी क्रमांक, रोल क्रमांक आणि पासवर्ड, जन्मतारीख प्रविष्ट करा आणि सबमिट करा. असे केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल. त्यानंतर तुम्ही तुमचा स्कोअर तपासा आणि पेज डाउनलोड करा.