नवी दिल्ली -स्वातंत्र्यदिनाच्या काही दिवस आधी इंटेलिजन्स ब्युरोने (IB) दिल्ली पोलिसांना 10 पानांचा अलर्ट पाठवला आहे. जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटना दहशतवादी हल्ल्यांचा कट रचत असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय खलिस्तानी दहशतवादीही अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे लाल किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी त्यांना विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. ( Terrorist Planned To Attack ) ( independence day ) ( Intelligence Bureau )
सर्व सुरक्षा यंत्रणांना अलर्ट करण्यात आले -सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर विभागाकडून दिल्लीत कार्यरत असलेल्या सर्व सुरक्षा यंत्रणांना अलर्ट करण्यात आले आहे. त्यांना पाठवलेल्या 10 पानांच्या कंन्टेटमध्ये आगामी स्वातंत्र्य दिनानिमित्त काही दहशतवादी संघटना मोठी घटना घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी दहशतवादी संघटना स्लीपर सेलचीही मदत घेऊ शकतात. हे लक्षात घेऊन पोलिसांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय गुप्तचर विभागाकडून रोहिंग्यांवर लक्ष ठेवण्यास विशेष सांगण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त अशांतता पसरवण्याच्या उद्देशाने लष्कर आणि जैश-ए-मोहम्मद राजधानीत कोणतीही घटना घडवू शकतात, असे या अलर्टमध्ये म्हटले आहे. जपानच्या माजी पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या हत्येचाही या अहवालात उल्लेख आहे. दिल्ली पोलिसांना स्वातंत्र्य दिनाच्या स्थळाभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आणि कसून तपासणी केल्यानंतरच कोणत्याही व्यक्तीला आत प्रवेश द्यावा.