मुरैना येथे एक विमान कोसळले भोपाळ (मध्यप्रदेश):भारतीय हवाई दलाची दोन लढाऊ विमाने सुखोई एसयू -30 आणि एक मिराज 2000 प्रशिक्षण सराव दरम्यान दुर्घटनाग्रस्त झाली आहेत. मध्य प्रदेशातील मुरैना येथे एक विमान कोसळले, तर दुसरे विमान राजस्थानच्या भरतपूरमध्ये 100 किमी अंतरावर कोसळल्याचे आता समोर आले आहे. सुरुवातीला हे दोन वेगवेगळे अपघात असल्याची चर्चा होती. मात्र हे दोन नाही तर एकच अपघात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दोन पायलट गंभीर जखमी:सुखोई Su-30 मध्ये दोन पायलट होते तर मिराज 2000 विमानात एक पायलट होता, असे संरक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. दोन पायलट बाहेर पडण्यात यशस्वी ठरल्यानंतर ते सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. हे दोन पायलट गंभीर जखमी असल्याची माहिती असून, त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर तिसऱ्या पायलटचा या घटनेत मृत्यू झाल्याची माहिती आहे.
आयएएफ फायटर जेट क्रॅश: दुसरीकडे, संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमध्ये पडलेल्या विमानानेही ग्वाल्हेर एअरबेसवरून उड्डाण केले होते. राजस्थानच्या भरतपूरमध्ये हे दुसरे विमान पडले आहे. आकाशात दोन्ही विमानांमध्ये टक्कर झाली असल्याची शक्यता आहे. मात्र अद्याप यावर भारतीय वायुसेनेचे अधिकृत वक्तव्य आलेले नाही. अधिकृत निवेदनानंतरच अपघाताबाबत योग्य माहिती मिळेल.
दुसरे विमान राजस्थानच्या भरतपूरमध्ये 100 किमी अंतरावर कोसळले वायुसेनेकडून न्यायालयीन चौकशी:मध्यप्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील पहाडगडच्या जंगलात लढाऊ विमान पडल्याने आग लागली. माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा पहाडगडच्या जंगलात रवाना करण्यात आला. ही घटना पहाडगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानपूर ईश्वरा महादेव जंगलातील आहे. हवेमध्ये या दोन विमानांची टक्कर झाली की नाही याची खात्री करण्यासाठी भारतीय वायुसेनेने न्यायालयीन चौकशी सुरू केली असल्याचे समजते. मात्र प्राथमिक माहितीनुसार टक्कर झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दोन विमानांचा ढिगारा वेगवेगळ्या ठिकाणी:हवाई दलाच्या उड्डाण केलेल्या सुखोई-30 आणि मिराज 2000 या दोन्ही लढाऊ विमानांची एकमेकांशी टक्कर झाली. दोघांच्या भीषण टक्करमुळे आकाशात भडकून आणि दोन्ही विमाने कोसळली. फायटर जेटच्या धडकेमुळे दोघांचा ढिगारा वेगवेगळ्या ठिकाणी पडला. यातील एक मध्यप्रदेशातील मुरैना आणि दुसरा राजस्थानच्या भरतपूरमध्ये पडण्याची भीती आहे. एका विमानाचे अवशेष मध्य प्रदेशात सापडले आहेत तर दुसऱ्या विमानाचे नाही. त्यामुळे राजस्थानमध्ये पडलेले विमान हे ग्वाल्हेरहून उड्डाण केलेले दुसरे विमान असल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: Fighter Jets Crashed in MP वायुसेनेच्या मिराजसुखोईची हवेत टक्कर अपघातात वैमानिक शहीद