दिंडीगुल IAF aircraft accident in Telangana : तेलंगणातील दिंडीगुल इथं आयएएफचं पिलाटस ट्रेनर विमान कोसळलंय. या घटनेत दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. हैदराबादहून नियमित प्रशिक्षण उड्डाण करताना आज सकाळी Pilatus PC 7 Mk II हे विमान कोसळलं. विमानातील दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाल्याचं भारतीय हवाई दलानं सांगितलंय. या अपघाताचं कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.
दोन वैमानिकांचा मृत्यू :अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन वैमानिकांपैकी एक प्रशिक्षक होता, तर दुसरा हवाई दलातील प्रशिक्षणार्थी वैमानिक होता. Pilatus PC7 Mk 2 हे विमान सकाळी वायुसेना अकादमीतून नियमित प्रशिक्षणासाठी निघालं होतं. पण, वाटेत विमानाचा अपघात झाला. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, विमानातील दोन्ही पायलटचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातानंतर काही मिनिटांतच विमान जळून खाक झालं. Pilatus PC7 Mk 2 हे एक लहान विमान आहे. हे विमान वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी वापरण्या येते.