नवी दिल्ली: भारतीय हवाई दलातील अग्निवीरवायू भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया संपली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी 24 जून ते 5 जुलै या कालावधीत झाली. यासाठी हवाई दलाच्या अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जारी करण्यात आली होती. आता भारतीय हवाई दलाने ट्विट करून माहिती दिली आहे की, या भरतीसाठी विक्रमी 7,49,899 उमेदवारांची नोंदणी झाली आहे. आतापर्यंत कोणत्याही भरती चक्रात सर्वाधिक 6,31,528 अर्जांची नोंदणी झाली होती.
२५ टक्के उमेदवार होणार कायम :अग्निपथ योजनेची घोषणा झाल्यानंतर देशभरातील तरुणांनी याला विरोध दर्शवला होता. असे असतानाही मोठ्या संख्येने तरुणांनी अग्निवीर होण्यासाठी अर्ज केले आहेत. लष्कराने अग्निवीर भरती रॅलीची अधिसूचनाही जारी केली असून नौदलातही अग्निवीरांच्या भरतीसाठी अर्ज सुरू आहेत. अग्निपथ योजनेंतर्गत, उमेदवारांना कोणत्याही सैन्यात केवळ 4 वर्षांसाठी भरती केली जाईल, त्यानंतर, आवश्यक असल्यास, जास्तीत जास्त 25 टक्के उमेदवार कायमस्वरूपी होऊ शकतात.
असा असेल पगार
४ वर्षांसाठी उमेदवारांची भरती केली जाईल. दरवर्षी पगार आणि भत्ते असे असतील.
1: पहिले वर्ष 30,000/- पगार आणि भत्ते