चेन्नई -तामिळनाडूत आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. तामिळनाडूतील दोन व्यापाऱ्यांकडे 500 कोटी रुपयांची मालमत्ता आढळून आली ( dept detects Rs 500-cr black income ) आहे. तामिळनाडूमधील नागरी करार, रिअल इस्टेट, जाहिरातींच्या व्यवसायात गुंतलेल्या दोन व्यावसायिक गटांच्या 40 हून अधिक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. त्यामध्ये आयकर विभागाला 500 कोटींहून अधिकची मालमत्ता आढळून आली. ती मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) ही कारवाई केली ( IT Raid Two TN Group ) आहे.
सीबीडीटीने एका निवेदनात म्हटले आहे की, जप्त करण्यात आलेली कागदपत्रे डिजीटल साधनांच्या तपासणीत आढळले की दोन्ही गट गेल्या काही वर्षांत फसव्या खरेदी आणि खर्चाचा दावा करुन त्यांचे उत्पन्न लपवत आहे. तसेच, नफ्याच्या वाटणी दाखवणारे पुरावे आढळले आहेत. या सर्वांचा हिशोब नियमित कागपत्रांत आढळला नाही. सीबीडीटीच्या दुसऱ्या गटाला असे सापडले की, या गटाने अनेक बनावट संस्था तयार केल्या. ज्यांचा वापर फसव्या खरेदी आणि खर्चाचा दावा करण्यासाठी केला जात होता.