मुंबई - आम्ही खूप सहन केले. हे आता आती होत आहे. आता बघाच, काय होतय ते असा निर्वाणीचा इशारा इशारा देताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहेत. (Shiv Sena Press Conference ) आम्हाला जेलमध्ये टाकण्याची भाषा करतात. मात्र, त्यांना सांगतो आता (Former Home Minister Anil Deshmukh) माजी गृहमंंत्री अनिल देशमुख बाहेर असतील आणि भाजपचे साडेतीन लोक जेलमध्ये असतील असही राऊत यावेळी म्हणाले आहेत. (SANJAY RAUT On BJP) दरम्यान, आज मंगळवार (दि. 15)रोजी दुपारी 4 वाजता शिवसेना भवन येथे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह आमदार, खासदार यांच्या उपस्थितीत राऊत पत्रकार परिषद घेणार आहेत.
ही नाव रडारवर
सगळ्याच बाजूने वातावरण तापलेले असताना शिवसेनेचे युवा नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील 'फक्त टॉस झाला आहे' असे सुचक विधान केले आहे. (Sanjay Raut will speak on BJP) त्यामुळे या साडेतीन नावांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रसार लाड, राणे आणि किरीट सोमैया ही नावे शिवसेनेच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा
राज्यात महाविकास आघाडीत शिवसेना सहभागी झाल्यानंतर भाजपने सेनेवर आगपाखड करायला सुरुवात केली. शिवसेनेची कोंडी करण्याची एकही संधी भाजप सोडताना दिसत नाही. (Press conference at Shiv Sena Bhavan) दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमैयांकडून आघाडीतील नेत्यांवर कथीत भ्रष्टाचाराचे आरोप सुरु आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांकडून शिवसेनेची मुस्कटदाबी करण्यासाठी सेना आमदारांसह आघाडीतील अनेक नेते रडारवर आहेत. (Sanjay Raut will hold a press conference) खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नानंतर ईडीकडून फुलेवाल्यांसह इतरांच्या चौकशीचा ससेमिरा सुरू आहे. (Prasad Lad) केंद्र आणि भाजपकडून टार्गेट केले असल्याचे लेखी पत्र उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांना संजय राऊत यांनी दिले आहे.
अभी तो टॉस हुआ है
राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच, संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना, तुम्ही बघाच. "आजपर्यंत आम्ही खूप सहन केले, बर्बाद पण आम्हीच करणार आहोत", "डोक्यावरुन आता खूप पाणी गेल आहे? असे सांगत भाजपच्या साडेतीन नेत्यांचा भांडाफोड करण्याचा इशारा दिला. तर दुसरीकडे नागपूर येथे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी 'सामना अजून सुरु व्हायचा आहे. अभी तो टॉस हुवा है' असे विधान केले. शिवसेनेच्या इशाऱ्यामुळे भाजप गोटात खळबळ उडाली आहे. तर कोणत्या नेत्यांना शिवसेना लक्ष करणार? याकडे सर्वांची लागले आहे.
फडणवीस टार्गेटवर?
राजकीय विश्लेषकांच्या (Devendra Fadnavis) मते, विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, किरीट सोमय्या किंवा त्यांचा मुलगा नील सोमैया आणि नारायण राणे यांचे सुपूत्र रडारवर असल्याचे बोलले जात आहे.
या प्रकरणामुळे फडणवीस गोत्यात?