महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

चोरी करून तलावात खडकावर जाऊन बसला चोर! मुख्यमंत्री मीडियासोबत आले तरच बाहेर येण्याची अट - हैदराबाद चोर तलावात शिरला

Hyderabad Thief On Rock In Lake : तेलंगणामध्ये चोरीची एक रंजक घटना समोर आली आहे. येथे एक चोर चोरी करून तलावाच्या मधोमध खडकावर जाऊन बसला. पोलिसांनी त्याला बाहेर येण्यासाठी खूप विनवणी केली. मात्र त्यानं बाहेर येण्यासाठी सांगितलेल्या अटी ऐकून सर्वांनाच धक्का बसला.

Hyderabad Thief On Rock In Lake
Hyderabad Thief On Rock In Lake

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 16, 2023, 6:06 PM IST

हैदराबादHyderabad Thief On Rock In Lake :चोरांना चोरी करताना रंगेहाथ पकडून जमावानं मारहाण केल्याच्या घटना याआधी अनेकदा घडल्या आहेत. मात्र हैदराबादमध्ये नुकताच एक असा प्रकार घडला, जो फारच रंजक आहे.

चोराच्या तलावातून बाहेर येण्यासाठी अटी : येथील शिवालयनगर परिसरात एक चोरटा पकडला जाऊ नये म्हणून चक्क तलावाच्या मधोमध असलेल्या खडकावर जाऊन बसला. चोरानं तलावातून बाहेर येण्यासाठी अटी घातल्या. तो म्हणाला की, मी तलावातून तेव्हाच बाहेर येईन, जेव्हा तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव पत्रकारांसह घटनास्थळी येतील. पोलिसांना या चोराला समजवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. पोलिसांनी चोराला अक्षरश: विनवणी देखील केली.

नेमकं काय घडलं : तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील शिवालयनगर भागातील नंदू आणि पत्नी नागलक्ष्मी यांच्या घरी १५ डिसेंबर रोजी चोरी झाली होती. त्या दिवशी हे जोडपं एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी घराला कुलुप लावून बाहेर गेलं होतं. सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्यांची मुलगी साईज्योती घरी आली असता तिला घराचा दरवाजा उघडा दिसला. तिनं आत जाऊन पाहिलं असता, बेडरूममध्ये कपाटातील सामान विखुरलेलं होतं आणि तेथे एक माणूस चक्क पैसे मोजत होता.

लोकांपासून वाचण्यासाठी चोर तलावात शिरला : हे दृष्य पाहून ती मुलगी घाबरली आणि तेथून आरडाओरडा करत पळून गेली. यानंतर चोरट्यानं घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर परिसरातील लोकांनी त्याचा पाठलाग सुरू केला. या लोकांपासून वाचण्यासाठी चोर एका मोठ्या तलावात शिरला आणि तेथील एका खडकावर जाऊन बसला. पुढील काही तासांत जे काही घडलं ते अत्यंत नाट्यमय होतं.

पोलिसांनी केली विनवणी : स्थानिक लोकांनी चोराला तलावातून बाहेर येण्याची विनंती केली. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. दरम्यान, लोकांनी संबंधित पोलिस ठाण्याला याची माहिती दिली. त्यानंतर एस आय व्यंकटेश आणि त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली. त्यांनी चोरट्याला तलावातून बाहेर येण्यास सांगितलं. रात्री ८.३० वाजता एस आय नारायण सिंह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनीही चोराला समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो मान्य झाला नाही. चोरानं पोलिसांना सांगितलं की, तेलंगणाचे विद्यमान मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव टीव्ही चॅनेलच्या पत्रकारांसह घटनास्थळी पोहोचल्यावरच तो तलावातून बाहेर येईल. चोर बाहेर येऊन त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस रात्री १२.३० वाजेपर्यंत तेथे थांबले. मात्र, त्याला पोलिसांनी पकडलं की नाही हे अद्याप समजू शकलेलं नाही.

हे वाचलंत का :

  1. मोदींच्या राज्यात बनावट टोल नाका! दीड वर्षांपासून सुरू लोकांची फसवणूक
  2. हत्येच्या आरोपीनं कायद्याचा अभ्यास करून लढला स्वतःचा खटला, १२ वर्षांनंतर निर्दोष मुक्त!

ABOUT THE AUTHOR

...view details