ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अबब... चक्क 117 चालान, अखेर मोस्ट वॉंडेट मोपेड चालकाला गाडीसह पकडले - हैदराबादेत चक्क 117 चालान

मोहम्मद फरीद खान (Mohammad Fareed Khan) याला नामपल्ली (Nampally) येथे नियमित वाहन तपासणीदरम्यान पकडण्यात आले होते. खान हा हेल्मेट न घालता होंडा अॅक्टिव्हा गाडी चालवताना (Seized Honda Activa bike without helmet) पकडला होता. यावेळी त्याची मागील माहिती काढली असता ही बाब उघडकीस आली आहे.

Hyderabad man caught with 117 unpaid challans worth Rs 29,720
चालानांचे बाकी होते 30 हजार रुपये
author img

By

Published : Nov 17, 2021, 4:26 PM IST

Updated : Nov 17, 2021, 4:42 PM IST

हैदराबाद - येथील वाहतूक पोलिसांनी मंगळवारी शहरातील विविध वाहतुकीच्या उल्लंघनांप्रकरणी 117 प्रलंबित चालनांसह एका व्यक्तीला (Hyderabad man caught with 117 unpaid challans) पकडले आहे. त्याच्याकडे मागील प्रलंबित चालानांची एकूण 29,720 रुपये बाकी होते. मंगळवारी तो विना हेल्मेट होंडा अॅक्टिव्हा दुचाकी (Seized Honda Activa bike without helmet) चालवत होता. यावेळी ही कारवाई पोलिसांनी केली.

विना हेल्मेट चालवत होता गाडी -

मोहम्मद फरीद खान (Mohammad Fareed Khan) याला नामपल्ली (Nampally) येथे नियमित वाहन तपासणीदरम्यान पकडण्यात आले होते. खान हा हेल्मेट न घालता होंडा अॅक्टिव्हा गाडी चालवताना पकडला होता. यावेळी त्याची मागील माहिती काढली असता ही बाब उघडकीस आली आहे.

...तर होऊ शकते वाहन जप्त -

मोटार वाहन (MV) कायद्यानुसार, पोलीस 10 पेक्षा जास्त न भरलेली चालान असलेली वाहने जप्त करू शकतात.

या प्रकरणात दाखल होत्या तक्रारी -

ई-चलन वेबसाइटनुसार, 2014 पासून जारी करण्यात आलेली बहुतांश चलन हेल्मेट शिवाय किंवा चुकीच्या पार्किंगसाठी होती. काही चालान सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क न घालण्याशी संबंधित होते. काही दंड रस्त्याच्या चुकीच्या बाजूने चालविण्याशी संबंधित आहेत.

बजावली होती पोलिसांनी नोटीस -

खान यांना कायदेशीर नोटीस देखील बजावण्यात आली होती. ज्यात त्याला चालान पूर्ण भरण्याचे सांगितले होते. नाहीतर त्याचे वाहन जप्त करण्यासाठी आरोपपत्र दाखल केले जाईल अशी सूचना दिली होती. त्यानूसार पोलिसांनी त्याचे वाहन जप्त केले आणि त्याला त्याचे वाहन परत हवे असल्यास व्याजासह दंड भरण्याची नोटीस बजावली आहे.

हेही वाचा -500 CR scam : मराठवाड्यात 30-30 नावाचा 500 कोटींचा घोटाळा, बिडकीन पोलिसात पहिला गुन्हा दाखल

हेही वाचा -डोळस कार्य; अंध व्यक्तीचा सायकलवरून भारत दौरा

Last Updated : Nov 17, 2021, 4:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details