मुरादाबाद (उत्तर प्रदेश) : लग्नानंतर पत्नीला हनिमूनला कुल्लू मनालीला घेऊन जाण्याचे वचन पूर्ण करण्यासाठी एक तरुण चक्क चोर बनला! त्याने आधी एक बुलेट चोरली, नंतर शहरातील एका औषध विक्रेत्याकडून पैशांनी भरलेली बॅग चोरली. बॅगेत सुमारे 1 लाख 90 हजार रुपये होते. चोरीची ही घटना दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. चोरीनंतर तरुण पत्नीला बुलेटवरून हनिमूनला घेऊन गेला. तेथून परतल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून 45 हजार रुपये आणि चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
जानेवारीत झाले होते लग्न :एसपी अखिलेश सिंह भदौरिया यांनी सांगितले की, आरोपी हाशिमचे जानेवारीत लग्न झाले होते. लग्नानंतर त्याने पत्नीला हनीमूनसाठी कुल्लू मनाली येथे नेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र यासाठी तो पैसे जमवू शकला नाही. त्याची पत्नी त्याला हनिमूनला नेण्यासाठी वारंवार आग्रह करत होती. यानंतर हाशिमने 3 जून रोजी ठाणे माझोला परिसरातून नवीन बुलेट मोटरसायकल चोरली. यानंतर त्याने एका मेडिकल एजन्सीची रेकी करण्यास सुरुवात केली. त्याने तेथे येणाऱ्या वैद्यकीय प्रतिनिधीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली.
घटना सीसीटीव्हीत कैद :4 जून रोजी अमरोहा येथील वैद्यकीय प्रतिनिधी नसीर बॅग घेऊन औषध विक्रेत्याच्या ठिकाणी पोहोचला. त्यापाठोपाठ हाशिम तोंडावर मास्क लावून आत शिरला. संधी साधून तो नसीरची बॅग घेऊन पळून गेला. पिशवीत इतर वस्तूंशिवाय 1 लाख 90 हजार रुपये होते. बॅग चोरल्यानंतर हाशिम चोरीच्या बुलेटसह पत्नीसह कुलू मनालीला पोहोचला. यानंतर त्याने मोबाईल बंद केला. दुसरीकडे, औषध विक्रेत्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरून आरोपीची ओळख पटवली गेली.
हिमाचलमध्ये सापडले लोकेशन :ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी हाशिमचा मोबाईल नंबर मिळवला आणि त्याच्यावर पाळत ठेवली. पोलिसांना हाशिमच्या मोबाईल नंबरचे हिमाचल प्रदेशात शेवटचे लोकेशन सापडले. त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला होता. हाशिम जेव्हा हनीमूनवरून मुरादाबादला परतला तेव्हा पोलिसांनी त्याला पकडले. पोलिसांनी त्याच्याकडून बुलेट आणि 45 हजार रुपये जप्त केले. पोलिस हाशिमच्या गुन्हेगारी इतिहासाची चौकशी करत आहेत. हाशिमने यापूर्वीही चोरीच्या इतर घटना केल्याचा पोलिसांना संशय आहे.
हेही वाचा :
- Thane Crime News: दोन गुन्हेगारांचे १४ गुन्हे उघड; लाखोंचे दागिने हस्तगत
- Delhi Crime : व्यावसायिकाची बंदुकीच्या धाकावर लूट; मुख्यमंत्री केजरीवालांनी राज्यपालांचा मागितला राजीनामा