मिर्झापूर Husband Rapes Wife : उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात पतीनं पत्नीवर बलात्कार केलाय. पतीनं जबरदस्तीनं घरात घुसून तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा पत्नीचा आरोप आहे. पोलिसांकडं तक्रार करुनही कारवाई झाली नाही. याप्रकरणी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पाच महिन्यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार पतीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
नेमकं प्रकरण काय :पती-पत्नीमध्ये वाद सुरु असून, हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात प्रलंबित आहे. दोघंही बऱ्याच दिवसांपासून वेगळ्या घरात राहत होते. पतीनं जबरदस्तीनं घरात घुसून बलात्कार केल्याचा आरोप पत्नीनं केलाय. मिर्झापूर जिल्ह्यातील हलिया पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात राहणाऱ्या एका महिलेनं 29 जुलै रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती की, तिचा पती जबरदस्तीनं घरात घुसला होता. घरात घुसून त्यानं तिच्यावर बलात्कार केला. याला तिनं विरोध केला तर पतीनं तिला जीवे मारण्याची धमकीही दिली.
न्यायालाच्या आदेशानुसार पतीविरोधात गुन्हा दाखल : याप्रकरणी महिलेनं पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर महिलेनं कोर्टात धाव घेतली. आता पाच महिन्यांनंतर न्यायालयाच्या आदेशावरुन पोलिसांनी पतीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय. हलिया पोलिस स्टेशन प्रभारी विष्णू प्रभा सिंह यांनी सांगितलं की, पत्नी ही पतीपासून वेगळी राहते. दोघांचं प्रकरण कौटुंबिक न्यायालयात सुरू आहे. महिलेच्या तक्रारीवरून न्यायालयाच्या आदेशानुसार पतीविरुद्ध बलात्कारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.
सात वर्षाच्या मुलीवर लग्न समारंभात बलात्कार : दुसऱ्या एका घटनेत उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील खाखरेरू परिसरातील एका गावात लग्न समारंभात एका तरुणानं सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार केलाय. यानंतर तो पळून गेला. कुटुंबीयांना मुलगी गावाबाहेर रक्ताच्या थारोळ्यात सापडली. याप्रकरणी वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. मुलीला वैद्यकीय उपचारासाठी कौशांबीच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलंय. आरोपींना पकडण्यासाठी एएसपींनी तीन पथकं तयार केली आहेत.
हेही वाचा :
- 16 वर्षाचा भाचा मामाकडं आला राहायला; मामीनं केला लैंगिक अत्याचार, गुन्हा दाखल
- गावगुंडाचं क्रौर्य, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून दिले सिगारेटचे चटके; मुंडणही केलं