धनबाद (झारखंड) : झारखंडच्या धनबाद जिल्ह्यातील महावीर नगर येथे राहणारा अनिल डोम आपल्या मेहुणीवर एकतर्फी प्रेम करत असे. त्याला आपल्या मेहुणीला पत्नीसह एकाच घरात ठेवायचे होते. मात्र त्याच्या पत्नी आणि घरातील सदस्यांना या गोष्टी आवडत नव्हत्या. यासाठी घरचे लोक अनिलला अनेकदा मनाई करायचे. त्यामुळे मेव्हणीचे प्रेम मिळवण्यासाठी अनिल डोमने पत्नीला मार्गातून दूर करण्याचा निर्णय घेतला. 8 जानेवारीला त्याने पत्नीला घराबाहेर ओढून रस्त्यावर आणले आणि तिच्यावर चाकूने हल्ला केला. बचावासाठी गेलेल्या मेहुणीला आणि सासूलाही त्याने चाकूने वार करून जखमी केले.
उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू : कायदा आणि सुव्यवस्था डीएसपी अरविंद कुमार बिन्हा यांनी प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती देताना सांगितले की, 8 जानेवारी रोजी धनसार पोलीस स्टेशन परिसरातील महावीर नगर येथे राहणाऱ्या अनिल डोम याने त्याची पत्नी अंजली देवी हिला घरातून ओढून नेले. त्याने तिच्यावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. या घटनेत त्याची मेहुणी दिव्या आणि सासू गीता देवी याही जखमी झाल्या आहेत. सर्वांना उपचारासाठी एसएनएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले आहे. तेथे उपचारादरम्यान पत्नी अंजली देवी हिचा मृत्यू झाला.