महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Triple Talaq to Fat Wife Meerut UP तू आधीपेक्षा लठ्ठ झाली; म्हणून तुला तलाक देतोय, मेरठ येथील धक्कादायक घटना - husband gave triple talaq wife become fat

उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे पतीने पत्नीला फक्त ती लठ्ठ झाली म्हणून तिहेरी तलाक दिला Triple Talaq to Fat Wife Meerut UP. पीडितेने या अन्यायाविरुद्ध पोलीस ठाणे गाठून न्यायाची याचना केली. fat wife triple talak up meerut

victim wife in a triple talaq case in Meerut, Uttar Pradesh expresses her grief
उत्तर प्रदेशातील मेरठ येथील ट्रिपल तलाक प्रकरणातील पीडित पत्नी व्यथा मांडताना

By

Published : Sep 1, 2022, 2:42 PM IST

मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे पतीने पत्नीला फक्त ती लठ्ठ झाली म्हणून तिहेरी तलाक दिला Triple Talaq to Fat Wife Meerut UP. पीडितेने या अन्यायाविरुद्ध पोलीस ठाणे गाठून न्यायाची याचना केली. fat wife triple talak up meerut

पत्नीचा लठ्ठपणा ठरला तलाकचे कारण -जिल्ह्यातील लिसाडिगेट पोलिस स्टेशन हद्दीतील झाकीर कॉलनीत राहणाऱ्या नजमा नावाच्या महिलेच्या पतीने तिला तिहेरी तलाकसाठी नोटीसही पाठवल्याचा आरोप केला आहे. नोटीस पाहून तिने पतीशी बोलण्याचा प्रयत्न केला; मात्र पतीने उत्तरात तू लठ्ठ झाली आहे. मी तुला घटस्फोट देत आहे, असे सांगितले. त्यानंतर पत्नीने लिसाडी गेट पोलीस ठाणे गाठून न्यायाची याचना केली. सीओ अरविंद चौरसिया यांनी सांगितले की, हे प्रकरण अद्याप त्यांच्या निदर्शनास आलेले नाही; परंतु जर कोणी अशा प्रकारे घटस्फोट देत असतील तर आम्ही चौकशी करू.

उत्तर प्रदेशातील मेरठ येथील ट्रिपल तलाक प्रकरणातील पीडित पत्नी व्यथा मांडताना

मारहाण करून घराबाहेर काढले -पीडितेने सांगितले की, 8 वर्षांपूर्वी तिचे सलमान नावाच्या व्यक्तीसोबत लग्न झाले होते. त्यांना 7 वर्षांचा मुलगाही आहे. पीडितेने सांगितले की, 1 महिन्यापूर्वी पती सलमानने तिला मारहाण करून घराबाहेर काढले आणि घटस्फोटाची नोटीस पाठवली. मी घटस्फोटाचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा पती सलमानने स्पष्टपणे सांगितले की, तू लठ्ठ झाली आहेस आणि मी तुला घटस्फोट देत आहे.

पोलिसांकडे कारवाईची मागणी -पीडितेचे म्हणणे आहे की, फोन करून तिने नोटीसबद्दल तिच्या पतीशी बोलण्याचा प्रयत्न केला; परंतु पतीने तिचा फोन कट केला. त्यानंतर नजमाने अनेक वेळा फोन केला पण पतीने फोन उचलला नाही. नजमा हिने रात्रीच कुटुंबीयांसह लिसाडी गेट पोलिस स्टेशन गाठून पोलिसांसमोर आपली व्यथा सांगितली आणि तक्रार देऊन पतीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा -Robbery on Pune-Solapur Highway बंदुकीतून फायरिंग करून कारवर 3 कोटी 60 लाखांचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा ७२ तासांत पर्दाफाश

ABOUT THE AUTHOR

...view details