प्रतापगड(राजस्थान) -आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरुन पतीने तिला लोखंडी साखळीने तब्बल तीन महिले बांधून ठेवले होते. राजस्थानमधील प्रतापगड येते हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पत्नीला त्याच्या तावडीतून सोडवले आहे. बांधून ठेवलेल्या साखखीचे वजन तब्बल ३० किलो होते.
हेही वाचा -कोव्हॅक्सिन कोरोनावर ७७.८ टक्के प्रभावी; तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष
- पत्नीला तीन महिने ठेवले होते साखळीने बांधून -
राजस्थानमधील प्रतापगढ जिल्ह्यातल्या लालगड ग्रामपंचायतमधील एका गावात ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गावात एका महिलेला साखळ्यांनी बांधून ठेवले आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीनुसार पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. तेव्हा त्यांना ही महिला साखळ्यांनी बांधून ठेवल्याचे दिसले. तसेच साखळ्यांना कुलुपदेखील लावले होते.
- पती हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता -