महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Ahmedabad Crime: पतीने पत्नीचा गळा चिरुन घराला लावली आग, अहमदाबादच्या गोदरेज गार्डन परिसरात दहशत - अग्निशमन दलाच्या जवानांनी

गोदरेज गार्डन परिसरात घराला आग लागल्याच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर वेगळीच घटना पुढे आली आहे. या घटनेत पतीने पत्नीचा गळा चिरुन घराला आग लावल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.

Ahmedabad Crime
संपादित छायाचित्र

By

Published : Jan 20, 2023, 8:02 PM IST

अहमदाबाद -पत्नीचा गळा चिरुन पतीने घराला आग लावल्याने शहरात खळबळ उडाली. ही घटना अहमदाबाद शहरातील गोदरेज गार्डन परिसरात घडली. अनिल बाधेल असे त्या पत्नीचा गळा चिरणाऱ्या पतीचे नाव आहे. तर अनिता बाधेल असे त्या गळा चिरल्याने ठार झालेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पुढील चौकशी सुरू केली आहे.

घराला आग लागल्याने अग्निशमन दलाने घेतली धाव :शुक्रवारी अहमदाबादच्या गोदरेज गार्डन सिटीमधील ईडन-व्ही फ्लॅटच्या चौथ्या मजल्यावरील घराला भीषण आग लागली. आगीची घटना कळताच अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. मात्र घरात पती-पत्नीचा वाद सुरू होता. त्या वादातून ही आग लागल्याची माहिती जवानांना माहिती पडली. पतीने पत्नीचा गळा चिरल्याने पत्नीचा मृत्यू झाला, तर आगीमुळे पती गंभीर जखमी झाल्याचे उघड झाले. त्यामुळे पती अनिल बाधेल याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला दाखल करण्यात आले.

कौटुंबिक कलहातून घडली घटना :आज सकाळी आग लागल्याची माहिती सुरक्षा रक्षकाने मला फोन करुन दिली. त्यामुळे मला फोन केल्यावर मीही लगेच घटनास्थळी पोहोचलो. मी फ्लॅटमध्ये फायर सेफ्टी बसवून पती प्तनीला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. त्यामुळे अग्निशमन दलाचे जवानही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र कौटुंबिक कलहाबाबत काही माहिती नसल्याची माहिती या सोसायटीचे चेयरमन दर्शनभाई यांनी यावेळी सांगितले. गेल्या सात वर्षांपासून हे कुटुंब येथे राहत आहे. या घटनेतील पती अनिल बाधेल एका केमिकल कंपनीत काम करत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

पती पत्नीने एकमेकांवर वार केल्याची चर्चा :या घटनेतील पती अनिल बाधेल आणि त्याची पत्नी अनिता बाधेल तळमजल्यावर एकमेकांवर कोयत्याने वार केल्याची चर्चा समोर येत आहे. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला असून पतीला सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. मात्र त्यांच्या घराला आग लागण्याचे कारण अद्याप समोर आले नाही. त्यामुळे या सर्व प्रकरणाचा तपास एफएसएलमार्फत करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details