पूर्णिया ( पाटना )- बिहारच्या पूर्णियामधील डगरुआ पोलीस स्टेशन हद्दीतील एक्का बरसोनी गावात एका व्यक्तीने विष पिऊन आत्महत्या केली. . मंटू असे मृताचे नाव असून तो अपंग होता. मृत मंटूच्या पत्नीचे सासरच्याच गावात राहणाऱ्या मनीषसोबत प्रेमसंबंध ( husband suicide due wife in Bihar ) सुरू होते. ती तिच्या प्रियकरासह पळून गेली. हा धक्का मंटूला सहन झाला नाही. त्याने आत्महत्या केली.
पत्नी प्रियकरासह फरार- मंटूची पत्नी प्रियकरासह फरार झाल्याचे ( Mantus wife absconded with boyfriend ) समोर आले. पत्नीच्या प्रियकराचे मनीषसोबत अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध ( suicide to wifes affair ) होते. या प्रेमप्रकरणाची माहिती मंटूला समजताच त्याने रागाच्या भरात मटिहाणी येथील सासरचे ( husband suicided in Purnia ) घर गाठले. कदाचित बायको माहेरच्या घरात असेल असे त्याला वाटले. पण माहेरी बायको न दिसल्याने मंटू हताश झाला.
विष पिऊन केली आत्महत्या- पत्नी प्रियकरासह फरार होताच पतीचा संयम सुटला. त्याने सासरच्या घरात विष प्राशन केले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मंटूच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती मिळताच सर्व लोक सासरच्या घरी पोहोचले. मंटूला घेऊन पूर्णिया सदर रुग्णालयात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मंटू अपंग असून त्याला लहान मुले आहेत.